शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चिमणी दिवस विशेष : भुर्र उडालेली चिऊताई परत येईना...!

By admin | Updated: March 20, 2017 16:37 IST

शहरातून ७० टक्के चिमण्या हद्दपार : सिमेंटच्या जंगलात चिमणी हरवली.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद : दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत चाललेली सिमेंटचे जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. यामुळे कधी काळी अंगणात, घरात आणि अनेक वेळा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी भुर्र उडाली. त्यांना परत आणण्यासाठी आणि त्यांना वाचविण्यासाठी काही पक्षी पे्रमींकडून जीवाचा आटापिटा सुरू आहे. अद्यापतरी त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही; परंतु त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने घेतलेला आढावा...

अँबेसॅडर म्हणून ओळख असलेल्या चिमणीची शहरात लक्षणीय घट होत असल्याचे समोर आले आहे. देशात चिमणीच्या पितकंठी चिमणी, घर चिमणी, जावा चिमणी, पहाडी चिमणी, वृक्ष चिमणी अशा पाच प्रजाती आहेत. यापैकी मराठवाड्यात दोन जातींच्या चिमण्या आढळतात. यामध्ये सामााजिक चिमणी (घरची चिमणी) ही मनुष्याजवळ राहते. भिंती, कौलारूंची घरे आदी ठिकाणी ती आपले घरटे (खोपा) बांधून वास्तव्य करीत असते, तर पितकंठ चिमणी (पिवळा गळा असलेली) ही जंगलात आढळते. ही चिमणी सहसा थव्याने वावरते. नराचे डोके राखाडी आणि गळा व छाती काळी असते. डोळ्यात काजळ घातल्याचा भास होतो. चिऊताई मात्र वरून तपकिरी, डोळ्यांवर फिकट भुवया व खालून शुभ्र असते. नर व मादी सहज वेगळे ओळखायला येतात. चिमण्यांचे खाद्य हे गवताच्या बिया, धान्य, अन्न, पिकांवरच्या अळ्या, झाडांवरचे कीटक आदी आहे. ज्या शहरात चिमण्यांची संख्या अधिक आहे, तेथील पर्यावरण उत्तम असते, असे जाणकारांचे मत आहे.

माणसाचा सहवास प्रियछोटा आकार, गब्दुल बांधा, आखूड शेपूट व साधासुधा मातकट रंग, नाजूक पाय; पण भक्कम कोनाकृती चोच ही चिमणीची ओळख आहे. देशात सर्वत्रच चिमणीचे वास्तव्य आहे. शहरात, नदीकाठी, अरण्यात, माळावर, डोंगरावर, वाळवंटी प्रदेशात अशा विविध ठिकाणी चिमणीने आपले घर वसवलेले आहे; पण चिमणीला माणसाचा सहवास अधिक प्रिय असल्याचे दिसते. माणसावर प्रेम करणारे जर माणसाव्यतिरिक्त कोणी असेल; तर ती म्हणजे चिमणी आहे.

चिमणी दिसणार चित्रांमध्येच?जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिमणी गेली कुठे असा प्रश्न पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून २० मार्च हा दिवस हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे.

चिमणी वाचवा अभियानऔरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात डॉ. किशोर पाठक हे चिमणी वाचविण्यासाठी जनजागृती करीत आहेत. शाळा, महाविद्यालयांसह सार्र्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. त्यांना चिमण्यांबद्दल माहिती देऊन त्यांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे पटवून देतात. त्यांचे फायदे-तोटे सांगतात, तसेच जखमी चिमण्यांसह इतर पक्ष्यांवर स्वखर्चातून उपचार डॉ. पाठक करतात. चिमणी उपचारातून सावरल्यावर तिला सुरक्षितस्थळी सोडले जात असल्याचेही डॉ. पाठक यांनी सांगितले.

चिमण्यांसाठी उभारले विहारजिथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आवाज, धिंगाणा, मस्ती चालतो त्याच महाविद्यालयाच्या परिसरात चिमण्यांचा चिवचिवाटही ऐकावयास मिळतो. औरंगाबाद शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकत्र येत येथे पक्षी विहार तयार केले आहे. येथे पक्ष्यांसह चिमण्यांसाठी पाणी, अन्न-धान्य, निवारा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रा.रमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पक्ष्यांची काळजी घेतली जाते. जखमी पक्षांना बरे होईपर्यंत पोटच्या लेकरासारखे सांभाळले जात असल्याचे प्रा.रमेश राऊत यांनी सांगितले. विद्यार्थीही आपला वेळ येथे देतात. शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातही चिमण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.