जालना : यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांना चांगलाच फटका बसला आहे. कापसानंतर सर्वात मोठे पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पीकही धोक्यात आले असून, उत्पादनात ५० टक्के घट येण्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. जिल्ह्यात कापसानंतर सर्वात जास्त सोयाबीनचे क्षेत्र ६४ हजार हेक्टरवर आहे. मृग नक्षत्रापासूनच पावसाने दगा दिला. परतीचा पावसानेही हुलकावणी दिली. परिणामी उत्पादनात मोठी घट येत आहे.ऐन फुलोरा तसेच दाने भरण्याच्या काळातच पाऊस उघडल्याने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले. आज रोजी एकरी दोन क्ंिवटलच्या आसपास उतारा निघत आहे. गत वर्षी हा उतारा पाच ते सहा क्ंिवटल पर्यंत गेला होता. त्यामुळे एकरी आठ ते दहा हजार रुपयांचा खर्चही भरुन निघणे जिकिरीचे बनले आहे. ऐन पीक बहराण्याच्या काळात खंडप्राय वृष्टी झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. किड तसेच रोबाद्दल कृषी विभागाने मार्गदर्शन केले असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे जोमात आलेले पीक उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून, खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन खरीप हंगामात पेरणी केली. असे असले तरी निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट येत असल्याने शेतकरी चिंतातुर आहेत.(प्रतिनिधी)
सोयाबीनच्या उत्पादनात आली ५० टक्के घट
By admin | Updated: October 27, 2014 00:09 IST