शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
4
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
5
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
6
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
7
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
8
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
9
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
10
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
11
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
12
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
13
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
14
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
15
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
16
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
17
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
18
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
19
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
20
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!

स्मार्टवर्कचा ‘विक्रम’

By admin | Updated: May 19, 2015 00:52 IST

दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, डीएमआयसीच्या भूसंपादन प्रक्रियेतून वेळ काढीत पर्यटन, जिल्ह्यातील कर्मचारी,

दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, डीएमआयसीच्या भूसंपादन प्रक्रियेतून वेळ काढीत पर्यटन, जिल्ह्यातील कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान आणि सिमेंट बंधाऱ्यांच्या कामासाठी स्मार्ट फोनच्या मदतीने वेगवेगळे उपयुक्त अ‍ॅप्स विकसित करीत घृष्णेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासह सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवून स्मार्ट वर्कचा ‘विक्रम’ मावळते जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केला.विकास राऊत ल्ल औरंगाबाददिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) मुंबई येथील कार्यालयात सहसंचालक म्हणून विक्रमकुमार यांची नियुक्ती झाली आहे. या प्रकल्पासाठी ते पद निर्माण करण्यात आले असून, विक्रमकुमार यांची पहिली नियुक्ती त्या पदावर झाली आहे. जरी मुंबईत असलो तरी शहरात डीएमआयसीच्या निमित्ताने येणे-जाणे असेलच. शहरासाठी काम करण्याची इच्छा कायम असल्याचे मत विक्रमकुमार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. दोन वर्षे चार महिन्यांचा कार्यकाळ विक्रमकुमार यांना मिळाला. या काळात केलेल्या कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट स्मार्ट फोनच्या साह्याने केले. स्वस्त धान्य दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण व डॉक्टरांसाठी स्मार्टवरून अ‍ॅप्लिकेशन तयार केले. तलाठ्यांच्या हजेरीसाठी, सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाच्या आढावादेखील स्मार्ट फोनवरून घेण्याची सुविधा विकसित केली. पर्यटन वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटक येतात. गाईड अ‍ॅप्स त्यासाठी तयार केले. हेडफोन लावून त्या अ‍ॅपद्वारे इंग्रजी, हिंदी, मराठी, जपानी भाषेतून लेण्यांची माहिती पर्यटकाला मिळेल. ४ ते ५ दिवसांत हे अ‍ॅप्लिकेशन सुरू होणार आहे. लेणी समोर येताच फोनवरील अ‍ॅप सुरू करताच पर्यटकांना माहिती मिळेल. म्हैसमाळ विकासासाठी कॅम्पेन रिसोर्ट टेंट तयार केले. निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव पर्यटकांना मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. मेअखेरपर्यंत या उपक्रमाचे काम पूर्ण होईल. डीपीडीसीच्या निधीतून दोन बसेस वेरूळ व अजिंठा लेणी दर्शनासाठी तयार केल्या जात आहेत. एस. टी. आणि पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढच्या महिन्यापासून त्या बसेस पर्यटकांच्या सेवेत येतील. महसूलजिल्ह्याच्या महसुलाचे लक्ष्य पूर्ण करता आले. ३,२९० कोटी रुपयांचा आकडा पार केला. ३२०० कोटींचा महसूल एक्साईजमधून मिळाला. सुवर्णजयंती राजस्व अभियान हाती घेतले. दाखले देण्याचे काम सुरू केले. जिल्हानिहाय कॅम्प घेतले. विविध खात्यांतर्गत उपक्रम घेतले. शिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप अनुदानाचे वाटप नियोजन करून केले. डीएमआयसी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ४ हजारांपैकी ३२०० हेक्टर भूसंपादन झाले आहे. ८०० हेक्टर बाकी आहे. भूसंपादन ही क्लिष्ट प्रक्रिया असूनही शांततेत पार पडली. तहसीलदार, तलाठ्यांचे परिश्रम त्यामागे आहेत. भूसंपादनासाठी २३ लाख रुपये एकरी रक्कम मोबदल्यासाठी दिली. दुष्काळ, लोकसभा, विधानसभा निवडणुका असतानाही ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, याचा आनंद आहे. शिवाय सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामेदेखील पाडली. अडीच वर्षांत मला व विभागाला कामातून उसंत मिळाली नाही. शहरात येणे होणारचडीएमआयसीच्या निमित्ताने आता शहरात येणे होणारच आहे. सहसंचालक हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले असून, त्या पदाच्या कामकाजाची भूमिका अजून समजलेली नाही. माझ्याकडे नेमकी काय जबाबदारी आहे हे पदभार घेतल्यानंतरच समजेल, असेही विक्रमकुमार म्हणाले.