तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे घरासमोर झोपलेल्या दोघांपैकी एकाला झोपेतून उठवून पाच जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी मंठा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास तळणी गावात घडली. अशोक बळीराम सदावर्ते यांच्या फिर्यादीनुसार किशोर बाजीराव सदावर्ते, उपसरपंच बाजीराव राघोजी सदावर्ते, गोरख बाजीराव सदावर्ते, राम बाजीराव सदावर्ते, वत्सला बाजीराव सदावर्ते आणि वत्सला बाजीराव सदावर्ते यांनी अशोक सदावर्ते यांना झोपेतून उठवून बेदम मारहाण केली. तसेच बांधकाम केल्यास जीवे मारण्याची दिली. याप्रकरणी फौजदार चंपालाल चरभरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी मंठा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार जी.एस. बांगर यांनी दिली. (वार्ताहर)जाळपोळसदर प्रकरणात अशोक सदावर्ते यांना जीवे मारण्यासाठी ते झोपलेल्या बाजेखाली लाकडे टाकून पेटवून देण्यात आली. मात्र पोलिसांनी वेगळाच गुन्हा दाखल केल्याची चर्चा तळणी परिसरात आहे. अशोक सदावर्ते यांना कोणत्याही जखमा झाल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे गावात तणाव आहे. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी सदर प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
झोपेतून उठवून मारहाण
By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST