अंबड : तालुक्यातील ढाकलगाव येथे एका शेतात पत्त्यांचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा मारून सहा जणांना अटक केली. मात्र अन्य तिघे जण फरार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई पोलिसांनी रविवारी दुपारी ४ वाजता केली. आरोपींच्या ताब्यातून १ लाख २९ हजार ६९0 रुपये पोलिसांनी जप्त केले. पोलिसांना खबर्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विश्वनाथ कुंडलिक भिसे यांच्या पथकाने हा छापा मारला. पोलिस आल्याचे जुगारी पळण्याच्या तयारीत होते. मात्र एकूण नऊपैकी सहा जण पोलिसांच्या तावडीत सापडले. अटक केलेल्या आरोपींमध्ये मुक्ताराम आसाराम लगट, सतीश काशीनाथ ढोणे, मुनेरखाँ पठाण, बाळू दाहू बाळसराफ, सलीम गफार पठाण (सर्वरा. ढाकलगाव) ज्ञानदेव नामदेव आटोळे (रा. पिठोरी सिरसगाव) यांचा समावेश आहे. तर फरार झालेल्या आरोपींमध्ये नामदेव आसाराम गायकवाड, दिलीप चत्रे, भीमराव रामा गाडे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई सहाय्यक फौजदार भिसे यांच्यासह हेकाँ अर्जुन पवार, शांतीलाल दाभाडे, फुलचंद घुसिंगे, राहुल काकरवाल, धनाजी कावळे, किरण मोरे, सागर बावीस्कर व चालक जाधव यांनी केली. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास आहेर हे करीत आहेत. (वार्ताहर)
पत्त्यांचा जुगार खेळताना सहा जणांना अटक
By admin | Updated: January 12, 2015 14:16 IST