------------------------------
बजाजनगरात रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोहटादेवी मंदिर परिसरात शनिवार (दि.१२) रक्तदान, सर्वरोग निदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन विष्णुपंत खेडकर, लोकनेता फाउंडेशनचे सुभाष केदार, सुदर्शन वाघ आदींनी केले आहे.
------------------------------
एकतानगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या कामगार वसाहतीत ठिक-ठिकाणी केरकचरा साचला असून सांडपाणीही उघड्यावरुन वाहत असते. ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी केवळ कागदोपत्री स्वच्छता करीत असल्याची ओरड नागरिकातून होत आहे. या भागात स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.
------------------------------