जालना : तालुक्यातील नेर येथील पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा न मिळाल्याने मंगळवारी दिवाणी न्यायायालाच्या आदेशाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीसह वाहन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. नेर येथील शेषराव सवाईराम राठोड यांची गट क्रमांक ७११ मधील जमीन पाझर तलावासाठी २००४ मध्ये संपादित करण्यात आली होती. वाढीव मोबदला मिळावा म्हणून राठोड यांनी अॅड. आर.जे.बनकर यांच्या मार्फत २००७ मध्ये दिवाणी न्यायालयात अपील दाखल केले होते.७ एप्रिल २०१४ रोजी सदर प्रकरणाचा निकाल लागून २ लाख ३८ हजार ९०६ रुपये मावेजा देण्याचा निर्णय दिला होता. मात्र शेतकऱ्यास मावेजा न मिळाल्याने दिवाणी न्यायाधीश परदेशी यांनी जप्तीचा आदेश दिला. यात खुर्ची, टेबल, टाईपरायटर, संगणक, झेरॉक्स मशीन, रॅक, चारचाकी वाहनाची जप्ती करण्यात आली.यावेळी अॅड. आर.एस. वाघ, अॅड. आर. जे.भुतेकर तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मावेजासाठी जालना एसडीएमची खूर्ची जप्त
By admin | Updated: September 9, 2015 00:26 IST