परभणी : शालेय पोषण आहार कामगारांनी त्यांचे मानधन आणि देयकासाठी २९ फेब्रुवारीपासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला प्रारंभ केला आहे.परभणी तालुक्यातील शालेय पोषण आहार कामगारांना आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांचे मानधन आणि कामाची देयके वाटप झालेली नाहीत. पूर्णा तालुक्यात डिसेंबर २०१४, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०१५ या काळातील इंधन बिल मिळालेले नाही. तसेच आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यातील इंधन बिल आणि मानधन अजूनही थकित आहे. अशीच अवस्था सेलू, पाथरी, मानवत आणि गंगाखेड या तालुक्यांची आहे. त्यामुळे थकित मानधन आणि बिलांचे वाटप तत्काळ करावे, या मागणीसाठी लाल बावटा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने २९ फेब्रुवारीपासून हे आंदोलन करण्यात आले.दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. किर्तीकुमार बुरांडे, पंढरीनाथ मुळे, अंबरीबुवा पुरी, नामदेव लोखंडे, इंद्रजीत आहेर, बाळासाहेब भोंग, सुभाषराव जोगदंड, रामभाऊ गवते आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
शालेय पोषण आहार कामगारांचे उपोषण
By admin | Updated: March 1, 2016 23:53 IST