शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सतीश चव्हाण यांच्या जिल्ह्यात प्रचारफेऱ्या

By admin | Updated: June 12, 2014 01:34 IST

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रचाराला गती देऊन ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत.पैठण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे कार्यकर्ते आ. सतीश चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेणारी पूर्तता पुस्तिका व जाहीरनामा पदवीधरांपर्यंत पोहोचवीत आहेत. पैठण येथे आ. सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत पदवीधरांचा मेळावा झाला. पैठण शहरासह बिडकीन, पाचोड, लोहगाव, विहामांडवा आदी सर्कलमध्येदेखील त्यांची फेरी झाली. आ. सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी प्रा. पी.आर. थोटे, डॉ. राजेश करपे यांच्यासह डॉ. गणेश मोहिते, रमेश झारगड, प्रल्हाद नरवडे, संदीप कासाटे, नितीन पोकळे, रमेश ठोंबरे, कैलास पतंगे, पप्पू जाधव, ज्ञानेश्वर गोडे आदी परिश्रम घेत आहेत.सिल्लोडमध्ये यशवंत महाविद्यालय, तसेच इंद्रराज महाविद्यालयात प्रचार प्रमुख नितीन बागवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय जाधव पाटील, सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष राजूमियाँ देशमुख, विनयन पाटील, प्राचार्य अशोक पंडित, प्राचार्य साबळे, एकनाथ डकले, शिवराम साखळे, अंकुशराव पालोदकर, जी.बी. दौड, आकाश पांढरे, मुरलीधर दापके आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जाधव यांनी केले. या बैठकीस पदवीधरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वैजापूर येथे आ. सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीधरांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विश्वास पाटील, अप्पासाहेब पाटील, दिलीप बोरनारे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील निकम, राजूसिंह राजपूत, जि.प. सदस्य दिनकर पवार, प्रतापराव धोर्डे, पं.स. सदस्य आधुडे, साहेबराव पवार, बाळासाहेब भोसले, राजाभाऊ मगर, रावसाहेब जगताप, पंढरीनाथ पवार, अबलचंद वेताळ, रझा पठाण आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. देवगाव रंगारी येथे बैठकदेवगाव रंगारी येथील श्री गणेश विद्यालयात पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी बैठक घेण्यात येऊन परिसरातील मतदारांना डॉ. प्रकाश भांडवलदार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उमेदवार सतीश चव्हाण यांनी केलेल्या कामांची माहिती देऊन पुढील पाच वर्षांसाठी निवडून देण्याची विनंती केली. याप्रसंगी गजानन सुराशे, कारभारी भांडवलदार, राजकुमार गंगवाल, मुख्याध्यापक एस.पी. जवळकर, देवीदास जाधव, विष्णू काळे, रघुनाथ चेअरमन, प्रा. शिवराज डुमणे, प्राचार्य पाथरे, पारधी सर, बी.जी. शिंदे आदी उपस्थित होते.