शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

सातारा येथील खंडोबा मंदिराच्या कामाचा मुहूर्त अडकला टेंडरमध्ये

By admin | Updated: April 24, 2016 00:11 IST

औरंगाबाद : सातारा येथील पुरातन खंडोबा मंदिराची दीपमाळ, मुलामा तसेच इतर कामांसाठी १ कोटी १३ लाखांचा निधी २०१५ मध्ये मंजूर होऊनही २०१६ मध्ये फक्त टेंडर बोलावण्याचा सोपस्कार सुरू आहे.

औरंगाबाद : सातारा येथील पुरातन खंडोबा मंदिराची दीपमाळ, मुलामा तसेच इतर कामांसाठी १ कोटी १३ लाखांचा निधी २०१५ मध्ये मंजूर होऊनही २०१६ मध्ये फक्त टेंडर बोलावण्याचा सोपस्कार सुरू आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळाही पुन्हा मंदिर व दीपमाळ झीजचे कारण ठरणार आहे, अशी खंत ट्रस्ट व भाविकांसह ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. सातारा खंडोबा मंदिराचे निर्माण अहिल्यादेवी होळकर यांनी केले असून, चंपाषष्ठीला मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा मंदिराच्या समोर असलेल्या दीपमाळीचे दिवे प्रदूषण व पर्यावरणातील परिणामाने ठिसूळ होऊन तुटून पडले असल्याने नुकसान झाले आहे. या मंदिराची देखभाल पुरातत्व विभागाकडे असल्याने मंदिर ट्रस्टला येथे स्वत:हून काहीही बदल करणे शक्य नाही. मंदिरासाठी एक सुरक्षारक्षक पुरातत्व विभागाकडून नियुक्त केला आहे, दीपमाळीच्या निर्माणासाठी एक महिनाभर मंदिराचे प्रवेशद्वार बंद ठेवून भाविकांना बाजूच्या दरवाज्याने मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. यात्रेदरम्यान स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता त्यावेळी मंदिराचे काम त्वरित करणार त्यामुळे उपोषण करू नये असे सुचविले होते; परंतु मार्च अँड संपला निवडणुका संपल्या तरीदेखील मंदिराच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी असते, दरवाज्यात खिळखिळी झालेली दीपमाळ धोकादायक स्थितीत असून, मांडर देवीची सतत आठवण होते. त्यामुळे स्थानिक नागरिक पुन्हा पुरातत्व विभागासमोर आंदोलनाच्या तयारीत आहेत.