औरंंगाबाद : आपण लहानपणापासूनच अंताक्षरी खेळत आलो आहोत. टीव्हीवरही अंताक्षरी बघत असतो. हे पाहून आपणही कधी या स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी इच्छा प्रत्येकालाच असते. ही इच्छापूर्ती होण्याची संधी ‘लोकमत सखी मंच’ने आता उपलब्ध करून दिली आहे. १९ जुलै रोजी, शनिवारी अंताक्षरी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यावेळी ‘पोस्टर बॉईज’ या आगामी चित्रपटातील स्टार कलाकार श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर, नेहा जोशी, ऋषिकेश जोशी, निर्माती दीप्ती तळपदे, दिग्दर्शक समीर पाठक यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.सखींच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सखी मंच नेहमीच कार्यरत असतो. ही स्पर्धा शनिवारी दुपारी ३ वाजता संत तुकाराम नाट्यगृहात (सिडको एन-५) घेण्यात येणार आहे. या सुवर्ण संधीचा सखींनी लाभ घ्यावा, असे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सखी मंचचे सदस्य असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत भवन, जालना रोड किंवा ९५५२५६४५६० किंवा ०२४०- २४८५३०१ या क्रमांकावर सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा. या कार्यक्रमाचे असोसिएट स्पॉन्सरर डायबेटिक डायेट आणि न्युट्री हेल्थ क्लिनिक हे आहेत.
सखी मंचतर्फे शनिवारी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन
By admin | Updated: July 17, 2014 01:35 IST