शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

सासुरवाडीस यायचा अन् गुन्हे करून जायचा

By admin | Updated: June 11, 2016 00:04 IST

औरंगाबाद : औरंगाबादला सासुरवाडीस यायचे अन् जाता - जाता वाहन चोऱ्या किंवा अन्य काही तरी गंभीर गुन्हा करून पुन्हा गावी निघून जायचे, अशा पद्धतीने गुन्हे करणारा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला.

औरंगाबाद : औरंगाबादला सासुरवाडीस यायचे अन् जाता - जाता वाहन चोऱ्या किंवा अन्य काही तरी गंभीर गुन्हा करून पुन्हा गावी निघून जायचे, अशा पद्धतीने गुन्हे करणारा कुख्यात गुन्हेगार अजय बंडू काळे (२०, रा. नागफणी, नेवासा, अहमदनगर) अखेर काल मुकुंदवाडी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या ताब्यातून औरंगाबादेतून चोरी केलेल्या १३ दुचाकी आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नगर जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार अजय काळे याची औरंगाबादेतील मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील राजनगरात सासुरवाडी आहे. सध्या तो तेथे आलेला असून, त्याने औरंगाबादेतून अनेक वाहने चोरी केलेली आहेत, अशी माहिती एका खबऱ्याकडून मुकुंदवाडीचे फौजदार कल्याण शेळके यांना मिळाली. माहिती मिळताच निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शेळके, जमादार कौतिक गोरे, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, कैलास काकड, विष्णू हागवणे यांनी काल रात्री राजनगर गाठले आणि अजयच्या सासुरवाडीच्या घरावर छापा मारला. त्यावेळी अजय तेथे पोलिसांना सापडला. या घराच्या आवारातच पोलिसांना ११ पल्सर मोटारसायकली, १ बुलेट आणि १ स्प्लेंडर, अशा एकूण १३ दुचाकी सापडल्या. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच आरोपी अजयने या सर्व दुचाकी चोरीच्या असल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. या सर्व दुचाकी त्याने दौलताबाद, सिडको, मुकुंदवाडी आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्या असल्याचे नंतर तपासात समोर आले. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा आरोपी अधूनमधून नेवाशाहून सासुरवाडीस यायचा. येथे आला की एक- दोन दिवस मुक्काम ठोकायचा. या कालावधीत तो वाहन चोऱ्या किंवा इतर गुन्हे करायचा आणि मग पुन्हा गावी निघून जायचा, अशा पद्धतीने त्याने अनेक गुन्हे केले आहेत. आरोपी अजय हा अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध जळगाव, बुलडाणा पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असून, त्या गुन्ह्यांमध्येही तो पोलिसांना हवा असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. आरोपी अजयचा भाऊही अट्टल गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांना पकडण्यासाठी नेवासाचे सहायक निरीक्षक गेले. तेव्हा या दोघांनी चक्क सहायक निरीक्षकांवर रिव्हॉल्व्हर रोखून तेथून धूम ठोकली होती. त्या गुन्ह्यातही अजय वाँटेड असल्याचे चौकशीत समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलीस पकडायला आले की त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखायचे किंवा फायरिंग करायची, अशा सवयीचा हा आरोपी असल्याचे मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले. या आरोपीकडे असलेल्या दोन्ही रिव्हॉल्व्हर काही दिवसांपूर्वीच नेवासा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण पथकाने अट्टल गुन्हेगार अजय काळे यास जेरबंद केले आणि त्याच्याकडून चोरीच्या तब्बल १३ दुचाकी जप्त केल्याचे कळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पथकास ५० हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या पथकाचा लवकरच सत्कार केला जाणार आहे.