शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

परिस्थितीशी झुंज देत सचिनचा षटकार..!

By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST

भालचंद्र येडवे , लातूर घरात शिक्षणाचा वारसा नाही... आर्थिक परिस्थिती हलाखीची... सात-आठ वर्षांपासून जन्मदात्या वडिलांचा संपर्क नाही...

भालचंद्र येडवे , लातूरघरात शिक्षणाचा वारसा नाही... आर्थिक परिस्थिती हलाखीची... सात-आठ वर्षांपासून जन्मदात्या वडिलांचा संपर्क नाही... असे एक ना अनेक प्रश्न सतावत असतानाही फक्त आपल्या आईचा चेहरा समोर ठेवून परिस्थितीशी झुंज देत सचिनने यशोशिखर गाठत थेट षटकारच मारले. उमरगा तालुक्यातील बलसूरचा मूळ रहिवासी असलेला सचिन भीमराव नांगरे याने पहिली ते चौथीपर्यंत लातूरच्या शिवाजी विद्यालयात, तर ५ वी ते ७ वीपर्यंत मोगरगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. सचिनच्या वडिलांची परिस्थितीही हलाखीची. नव्हे, गेल्या सात-आठ वर्षांपासून सचिनच्या वडिलांनी त्याचे तोंडही बघितले नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आणि सचिनच्या शिक्षणाची आवड पाहून मामा महादेव बबन सोनवणे यांनी त्याच्या शिक्षणाचा विडा हाती घेतला अन् सचिनसाठी लातूरला घर करून त्याला सदानंद विद्यालयात प्रवेश दिला. त्याची आई मोलमजुरी व घरकाम करून सचिनची देखभाल करीत आहे. लहानपणापासून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या सचिनला भौतिक सुविधा काय असतात, याची कसलीही जाणीव नव्हती. त्याने आपल्या परिस्थितीची जाण ठेवत संघर्षातूनच यशाचा मार्ग शोधला नि दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले. सचिनची परिस्थिती व जिद्द पाहून शाळेतील शिक्षक व मामांनी त्याचे बोट धरून यशोशिखरापर्यंत नेऊन पोहोचविले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना त्यावर मात करून लेकराने कष्टाचे चीज केले, अशी भावना सचिनच्या आईने व्यक्त केली. त्याच्या यशाचा सर्वत्र गवगवा होत आहे. मात्र एवढ्या मोठ्या यशाची सचिनच्या वडिलांना मात्र तसूभरही कल्पना नाही, ही खंत मात्र सचिनच्या मनात राहिली. सचिनला इंजिनिअर व्हायचे असून, त्याचा भाऊही मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. तर लहान बहीणही मामाकडेच शिक्षण घेत आहे. मी कितीही साथ दिली असली, तरी सचिनने आपल्या जिद्दीवरच एवढे मोठे यश संपादन केल्याने मी व माझ्या बहिणीने केलेल्या कष्टाचे चीज झाले, अशी भावना सचिनचे मामा महादेव सोनवणे यांनी व्यक्त केली.