औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रायन इंटरनॅशनलने औरा इंटरनॅशनल संघावर एका धावेने चित्तथरारक मात केली. दुसऱ्या लढतीत सेंट लॉरेन्सने सेंट जोन्स संघावर तब्बल ६१ धावांनी मात केली. आज झालेल्या सामन्यात जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारा विशाल धुमाळ आणि सुरेख गोलंदाजी करणारा यश बोडखे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या सामन्यात रायन इंटरनॅशनलने प्रथम फलंदाजी करीत १0 षटकांत ७३ धावा केल्या. त्यात सर्वाधिक २३ या अवांतर धावांच्या रूपात त्यांना मिळाल्या. त्यांच्याकडून जीवनदीपने एक चौकार व एका षटकारासह १७ व प्रतीक कापडियाने २ चौकारांसह १४ धावा केल्या. आदित्य पांडे व सूजल शिंदे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात औरा इंटरनॅशनलचा संघ १0 षटकांत ९ बाद ७२ धावा करू शकला. त्यांच्याकडून ओम जाधवने ३ चौकारांसह सर्वाधिक २३ धावा केल्या. सुजल शिंदेने १२ धावा केल्या. रायन इंटरनॅशनलकडून यश बोडखेने १३ धावांत ४ गडी बाद केले. तरुल बोरकर व यश गाढवे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुसºया सामन्यात विशाल धुमाळच्या चौफेर टोलेबाजीच्या जोरावर सेंट लॉरेन्सने १0 षटकांत १ बाद १0७ धावा फटकावल्या. विशालने आयुषसिंग याच्या साथीने ८.५ षटकांत सलामीसाठी ९0 धावांची भागीदारी केली. विशाल धुमाळने ३२ चेंडूंतच ८ चौकारांसह नाबाद ५७ धावा केल्या. त्याला आयुषसिंगने २४ चेंडूंत ५ चौकारांसह ३६ धावा करीत साथ दिली. प्रत्युत्तरात सेंट जोन्सचा संघ ६.१ षटकांतच ४६ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून राज एस. याने १३ धावांचे योगदान दिले. फलंदाजीत स्फोटक अर्धशतकी खेळी करणाºया विशाल धुमाळ याने गोलंदाजीतही चमक दाखवीत ६ धावांत ६ गडी बाद करीत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याला प्रकाश वाघ याने २ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली.
रायनचा औरा इंटरनॅशनलवर चित्तथरारक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:47 IST
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत रायन इंटरनॅशनलने औरा इंटरनॅशनल संघावर एका धावेने चित्तथरारक मात केली. दुसऱ्या लढतीत सेंट लॉरेन्सने सेंट जोन्स संघावर तब्बल ६१ धावांनी मात केली. आज झालेल्या सामन्यात जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारा विशाल धुमाळ आणि सुरेख गोलंदाजी करणारा यश बोडखे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
रायनचा औरा इंटरनॅशनलवर चित्तथरारक विजय
ठळक मुद्देआंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : सेंट लॉरेन्सची सेंट जोन्सवर मात