शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

उभ्या चारचाकींनी घोटला रस्त्यांचा गळा

By admin | Updated: July 8, 2014 01:06 IST

औरंगाबाद : जालना रोडसह विविध भागांत भर रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे अन्य वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

औरंगाबाद : जालना रोडसह विविध भागांत भर रस्त्यावर चारचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे अन्य वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर बेकायदा उभी केलेली ही वाहने वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष दिसते.आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर मोठी व मध्यम चारचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे रस्ता अधिकच अरुंद होतो. त्याचा त्रास अन्य वाहनचालकांना होतो. रस्त्यावर नो पार्किंगच्या जागी काही मिनिटांसाठीही दुचाकी उभी केली तरी ती उचलली जाते; परंतु अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर उभ्या केलेल्या या चारचाकी वाहनांवर काही कारवाई होताना दिसत नाही. ठराविक वाहनांवर कारवाई करताना वाहतुकीला अडथळा निर्माण केलेल्या या चारचाकी वाहनांवरही कारवाईची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.जालना रोडवर चिकलठाण्यापासून तर थेट महावीर चौकापर्यंत ठिकठिकाणी थेट रस्त्यावर चारचाकी वाहने उभी असतात. जालना रोड1जालना रोडवर मोंढा नाका ते आकाशवाणी चौक आणि आकाशवाणी चौक ते सेव्हन हिल उड्डाणपुलापर्यंत ठिकठिकाणी भररस्त्यावर अवजड तसेच चारचाकी वाहने उभी केलेली असतात. अशाच पद्धतीने सेव्हन हिल उड्डाणपूल ते आकाशवाणी, आकाशवाणी ते मोंढा नाका रस्त्यावर वाहने उभी केली जातात. अदालत रोडवरही अशीच स्थिती दिसते. आकाशवाणी चौक, मोंढा नाका या ठिकाणी वाहतूक पोलीस असूनही चौकात उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही.कॅनॉट प्लेस2कॅनॉट प्लेस परिसरात दुकानांसमोरील रस्त्यावर दिवसभर वाहने उभी असतात. वाहनचालकवाहन रस्त्यावर आडवे वा बेशिस्तपणे उभे करून दुकानांमध्ये जातात. अशा पद्धतीने एका जागी वाहन उभे करून ते खरेदीसाठी निर्धास्त फिरत असतात.औरंगपुरा, निरालाबाजार3औरंगपुरा, निराला बाजार, पैठणगेट हे भाग बाजारपेठेचे आहेत. दिवसा व सायंकाळीही येथे गर्दी दिसून येते. वाहन उचलून नेले जाण्याच्या भीतीने या भागात रस्त्यावर दुचाकी लावताना वाहनचालक अनेकदा विचार करतात; परंतु चारचाकी वाहने या ठिकाणी उभी केलेली दिसतात.अन्य भागांतही हीच स्थिती4मिलकॉर्नर, सिडको, त्रिमूर्ती चौक, गजानन महाराज मंदिर चौकासह अन्य भररस्त्यावर वाहने उभी केलेली दिसतात; परंतु मोजक्या भागातच वाहतूक पोलिसांची कारवाई होताना दिसते.नियमितपणे कारवाईरस्त्यावर चारचाकी वाहने उभी केल्यास नियमितपणे कारवाई केली जाते. अशा वाहनांना जॅमर लावले जाते. त्यांच्या चालक, मालकांना दंड ठोठावला जातो. रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांवर कारवाई सुरू असते, असे सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.अपघाताचा धोकाअनेक रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. अशा कोंडीतून मार्ग काढताना उभ्या केलेल्या वाहनांवर धडकल्यामुळे अपघातही होतात.