शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
5
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
6
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
7
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
8
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
9
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
10
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
11
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
12
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
13
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
14
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
15
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
16
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
17
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
18
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
19
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
20
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?

पश्चिम मतदारसंघासाठी रिपाइंचा दावा

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

विकास राऊत , औरंगाबाद लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता शिवसेना-भाजपा व रिपाइं या महायुतीला सध्या स्फुरण चढले आहे.

विकास राऊत , औरंगाबादलोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता शिवसेना-भाजपा व रिपाइं या महायुतीला सध्या स्फुरण चढले असून, विधानसभेत पश्चिम मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी रिपाइं आठवले गटाने डावपेच आखण्यास तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ही महायुती अभेद्य राहिली तर रिपाइं त्या जागेसाठी नेटाने प्रयत्न करण्याच्या तयारीला लागली आहे. शिवसेनेचे संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीकडून ती जागा रिपाइं (आ) गटासाठी सोडण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील, त्यावरच सर्व काही अवलंबून आहे. रिपाइं खा.रामदास आठवले यांनी मध्यंतरी ती जागा मागण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य केले होते.खा.चंद्रकांत खैरे आणि आ.शिरसाट यांच्यात मागील साडेचार वर्षांमध्ये विशेष असे सख्य राहिलेले नाही. जि. प. निवडणुका आणि विविध राजकीय कार्यक्रमांचा आढावा घेतला तर प्रत्येक व्यासपीठावरून दोघांमध्ये जुगलबंदी झालेली आहे. खा.खैरे यांचे चिरंजीव युवा सेनेचे जिल्हाधिकारी ऋषिकेश खैरे यांनादेखील त्या मतदारसंघातून निवडणूक मैदानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच गेल्या वेळचे पराभूत उमेदवार चंद्रभान पारखे यांनाही उमेदवारीची अपेक्षा आहे. तर रमानगरचे नगरसेवक मधुकर सावंत यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. काँगे्रसला त्या मतदारसंघामध्ये पुष्कळ काम करण्याची गरज असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघातील मतांच्या आकड्यावरून दिसते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या त्या मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध काँग्रेस, अशी थेट लढत २००९ मध्ये झाली होती. आ. शिरसाट हे १४ हजार २१३ मतांनी विजयी झाले होते. यावेळी बहुरंगी लढत होण्याचे संकेत इच्छुकांच्या यादीवरून दिसत आहे. मनसे यावेळी उमेदवार देणार की नाही, याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. महायुतीमध्ये जागा वाटपांवरून काही वाद झाला तर भाजपादेखील पश्चिममधून निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपानेदेखील स्वतंत्र तयारी केली आहे. परंतु भाजपाने अजून उमेदवाराची चाचपणी केलेली नाही. २००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मतेशिवसेनासंजय शिरसाट५८,००८काँग्रेसचंद्रभान पारखे४३,७९७अपक्षअमित भुईगळ ३७९१इच्छुकांचे नाव पक्षआ. संजय शिरसाटशिवसेनाऋषिकेश खैरेशिवसेनाजितेंद्र देहाडेकाँग्रेसडॉ.पवन डोंगरेकाँग्रेसअरविंद धीवरमनसेमधुकर सावंतअपक्ष