शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

जैन धर्माच्या समृध्दतेची साक्ष शिलालेखातून मिळते : सुजाता शास्त्री

By admin | Updated: December 28, 2014 01:15 IST

दत्ता थोरे ,लातूर लातूरच्या पुनरुत्थानाचे दस्तऐवजी दाखले जैन शिलालेखात दडले आहेत. किंबहुना मराठीचा पहिला शिलालेख श्रवणबेळगोळच्या रुपाने पहायला मिळतो.

दत्ता थोरे ,लातूरलातूरच्या पुनरुत्थानाचे दस्तऐवजी दाखले जैन शिलालेखात दडले आहेत. किंबहुना मराठीचा पहिला शिलालेख श्रवणबेळगोळच्या रुपाने पहायला मिळतो. हे शिलालेख मराठी भाषा, जैन धर्म आणि मानवी विकास या साऱ्यांची साक्ष देणाऱ्या आहेत, असे मत सुजाता शास्त्री यांनी मांडले. लातूर सकळ जैन समाज आणि महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या दहाव्या अधिवेशनानिमित्त आल्या असता संमेलनाध्यक्षांच्या भाषणानंतर त्या खास ‘लोकमत’शी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, या इतिहास परिषदेच्या अधिवेशनात मी हीच भूमिका घेऊन आले आहे. आज ‘लातूर’ असले तरी कधी काळी हे लत्तनूर (खटनूर) होते. स्वत: राष्ट्रकूट राजा आपला उल्लेख लत्तनूरचे पुरार्धाम्बर (लॉर्ड आॅफ द सिटी लत्तनूर) असा करीत असे. महामंडलेश्वर रट्ट कालसेन, कर्तवीर्थादी यांच्या प्रशस्त्रीपत्रांमध्येही ‘लत्तनूर -पुरेश्वर’अशा नावाने त्यांनी उल्लेख केला आहे. लातूरच काय तर जैन धर्माची समृध्द परंपरा पहायची असेल तर आपल्याला शिलालेख हे उत्तम आधार आहेत. मी ज्या जिथे वाढले त्या कर्नाटकसारख्या राज्यात ३६ हजार शिलालेख आहेत. त्यातील आठहजार शिलालेख हे जैन शिलालेख आहेत. शैवशिलालेख जसे शिवस्तुतीने आणि वैष्णव शिलालेख जसे विष्णुस्तुतीने तसे जैन शिलालेखांचे वैशिष्ट्ये म्हणजे बहुतांश शिलालेखांची सुरुवात ही मंगलस्त्रोत आणि जिनस्तुतीने झाली आहे. ‘भद्रमस्तु जिनशासनाय’, ‘ओं नम: सिध्देभ्य:’, ‘श्री वीतरागाय नम:’, ‘श्री वर्धमानाय नम:’, श्री गोम्मटेशायनम:’ अशा वाक्यांने जैन शिलालेखांची सुरुवात आहे. हे संस्कृतसह कन्नड, मराठी आणि इतर भाषातही आहेत. त्यामुळे जैन धर्म देशभर कसा व्यापला होता याची सहज प्रचिती येते. ‘श्रीूमप्तरम् गंभीरस्याद्वादामोघ लांछन जीयात् त्रैलोक्यनाथस्य शासनं जिनशासनम्’ हा श्लोक दीड हजाराहून अधिक शिलालेखांवर सुरुवातीला आहे. या शिलालेखांच्या पहिल्यांदा अभ्यासाचे श्रेय डॉ. ए. एन. उपाध्ये यांना द्यावे लागेल.