लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित सद्भावना दौडला मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या काळी कमानपासून सकाळी ८ वाजता या दौडला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी दौडला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगिर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, नगरसेविका मंगला मुदगलकर, विविध धर्माचे धर्मगुरु आदींची प्रमुख उपस्थिती होती.या दौडमध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ही दौड विसर्जित करण्यात आली.
परभणीत सद्भावना दौडला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:12 IST