शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

आरक्षित वॉर्डांत जखडली चळवळ

By admin | Updated: November 8, 2016 00:03 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये अनुसूचित जातीसाठी २६ जागा आरक्षित आहेत.

विशाल सोनटक्के उस्मानाबादजिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये अनुसूचित जातीसाठी २६ जागा आरक्षित आहेत. या २६ वॉर्डांबरोबरच अनुसूचित जातीची लोकसंख्या अधिक असलेल्या काही ठराविक वॉर्डांमध्ये एकूणच चळवळ जखडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ऐनवेळी इतर पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतल्याचे जिल्हाभरातील चित्र आहे. उस्मानाबाद नगर पालिकेत आरक्षित असलेल्या प्रभाग १ (अ) मध्ये तब्बल दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे प्रमुख राजकीय पक्षाबरोबरच काही अपक्षही रिंगणात असल्याने चुरशीचा सामना होवू शकतो. प्रभाग क्र. ३ (अ) मध्ये अवघे तीन उमेदवार रिंगणात असून, सध्यातरी या एकमेव मतदारसंघात सेना-भाजपाची युती झाली आहे. प्रभाग १४ (अ) मध्ये दहा उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले आहेत. या आरक्षित वॉर्डाबरोबरच प्रभाग क्र. १४ (ब) या खुल्या वॉर्डात विविध आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आमने-सामने ठाकल्याचे चित्र आहे. येथून रिपाइंचे राजा ओव्हाळ, काँग्रेसचे सिध्दार्थ बनसोडे, भाजपाकडून विशाल शिंगाडे यांच्यासह प्रज्ञावंत ओव्हाळ, पृथ्वीराज चिलवंत, किशोर बनसोडे, कल्याण माळाळे आणि मैनुद्दीन पठाण आदींमध्ये रस्सीखेच सुरू आहे. प्रभाग क्र. ७ (अ) मध्ये ८ तर प्रभाग क्र. १३ (अ) मध्ये तब्बल बारा उमेदवार मैदानात आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. १४ (अ) मध्येही उमेदवारांची अशीच भाऊगर्दी झाल्याचे चित्र असून, येथूनही दहा जणींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ऐन वेळी पक्ष बदलल्याचेही दिसून येते. नळदुर्ग पालिकेत राखीव असलेल्या प्रभाग २ मध्ये काँग्रेसकडून राखी बनसोडे आणि राष्ट्रवादीकडून भारती बनसोडे या नवख्या उमेदवारांत सामना रंगणार आहे. तर प्रभाग ८ मधून काँग्रेसतर्फे मारूती खारवे, राष्ट्रवादीकडून दयानंद बनसोडे, प्रभाग ८ (अ) मधून योगेश बनसोडे आणि सचिन बनसोडे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कळंब पालिकेत प्रभाग क्र. ३ (अ) मध्ये माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांच्या पत्नी सुनंदा गायकवाड काँग्रेसकडून तर माजी नगराध्यक्ष किरण हौसलमल यांच्या भावजय इंदूमती हौसलमल या राष्ट्रवादीकडून आमने-सामने ठाकल्या आहेत. प्रभाग क्र. ६ मध्येही असाच चुरशीचा सामना रंगणार आहे. आंबेडकरी चळवळीतील दिवंगत नेते मच्छिंद्र गायकवाड यांच्या कन्या सरला सरवदे या राष्ट्रवादीकडून तर शिवाजी सिरसट यांच्या पत्नी मीनाक्षी या काँग्रेसकडून नशीब आजमावणार आहेत. मच्छिंद्र गायकवाड यांचे सुपुत्र लखन यांनी प्रभाग क्र. ४ (अ) मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, रिपाइंचे नेते मुकुंद साखरेही याच प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. तुळजापूर नगर पालिकेमध्ये प्रभाग क्र.२ मध्ये चुरशीची लढत होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रिपाइं आघाडीतर्फे वैशाली तानाजी कदम, काँग्रेस-भाजपा आघाडीकडून अप्सरा बाळासाहेब कदम यांच्यात चुरस असून, लक्ष्मी महेश कदम आणि किमया प्रताप कदम या अपक्ष उमेदवारांचाही अर्ज आहे. प्रभाग क्र. ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-रिपाइं आघाडीकडून किशोर बाबूराव साठे तर काँग्रेस-भाजपा आघाडीकडून अनुक्रमे शंकर महादू शिंदे आणि दीपक बाबूराव खंदारे यांचे अर्ज आहेत. शिवसेनेकडून स्वरूप अभिमान कांबळे आणि अपक्ष म्हणून महेंद्र तुळशीराम कदमही रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ६ मध्ये चुरशीचा दुरंगी सामना अपेक्षित असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप-रिपाइं आघाडीकडून हेमा औदुंबर कदम, काँग्रेस-भाजपा आघाडीकडून सुनीता अविनाश रसाळ आणि संगिता विलास कदम यांच्यासह संपतबाई सुभाष कदम यांची उमेदवारी असून, किमया प्रताप कदम या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.