जिंतूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भीषण दुष्काळ व बेरोजगारी यातून राज्याला बाहेर काढून शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवू. त्यासाठी येणाऱ्या काळात महायुतीसोबत सोबत रहा, असे आवाहन आ.पंकजा पालवे यांनी केले.जिंतूर येथे संघर्ष यात्रेदरम्यान आयोजित सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर खा.बंडू जाधव, माजी आ.विजय गव्हाणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे, सुरजीत ठाकूर, प्रवीण घुगे, श्रीनिवास मुंडे, विलास गिते, श्यामसुंदर मुंडे, राम बुधवंत, डॉ.भागवत कराड, माजी आ.बबनराव लोणीकर आदींची उपस्थिती होती.आ. मुंडे म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्तेची फळे गडापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात परिवर्तन गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ आदी प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याला सत्तेवरुन खाली खेचून गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करा, असे आवाहनही त्यांनी केले.(वार्ताहर)
राज्यातील शेतकऱ्यांचे दु:ख दूर करणार
By admin | Updated: August 31, 2014 00:11 IST