शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 16:30 IST

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) रविवारी (दि.१३) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘मसाप’आणि  बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २३-२४ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथे हे साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे.

ऑनलाईन लोकमत  

औरंगाबाद, दि. १४ : ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) रविवारी (दि.१३) झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ‘मसाप’तर्फे दिल्या जाणा-या जीवनगौरव पुरस्कारासाठी मधुकरराव मुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘मसाप’आणि  बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २३-२४ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथे हे साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे.

प्रा. रंगनाथ तिवारी अमराठी असूनही त्यांनी मराठीमध्ये दर्जेदार साहित्यनिर्मिती करून साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली. एक उत्तम कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिभा असाधारण आहे. कादंबरीसह नाटक, कथा, समीक्षा आणि अनुवाद अशा वैविध्यपूर्ण वाङ्मय प्रकारांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यामुळे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली, असे ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले.

उस्मानाबादेत वर्धापन सोहळा

यंदा ‘मसाप’चे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होत असून, उस्मानाबाद येथे २९ सप्टेंबर रोेजी परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उस्मानाबाद येथे परिषदेतर्फे बांधण्यात येणाºया ‘संत गोरोबा काका’ सभागृहाचे पी. डी. पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनदेखील केले जाणार आहे. ‘मसाप’च्या ७५ व्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यात परिषदेचे विश्वस्त मधुकर मुळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  

परिषदेच्या अमृतमहोत्सवी वर्षात ‘मराठवाडा वाङ्मयीन इतिहास’ हा लेखन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, भास्कर बडे, आसाराम लोमटे, रसिका देशमुख, के. एस. अतकरे, डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. विलास वैद्य, प्रा. शेषराव मोहिते, डॉ. संजीवनी तडेगावकर, दगडू लोमटे, डॉ. सतीश साळुंके, नितीन तावडे, जीवन कुलकर्णी, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. दिलीप बिरुटे, विलास सिंदगीकर आणि प्रा. सुरेश जाधव उपस्थित होते.

अध्यक्षांचा परिचय

- प्रा. रंगनाथ तिवारी यांनी दीर्घकाळ अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. 

-‘संपल्या सुरावटी’, ‘उत्तम पुरुष : एक वचन’, ‘देवगिरी बिलावल’, ‘बेगम समरू’, ‘अनन्वय’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबºया.

- मराठी व हिंदी भाषेतील ७ कादंबºया, २ नाटके, १ कथासंग्रह, २ समीक्षा ग्रंथ आणि अनुवाद अशी त्यांची ग्रंथसंपदा.

- त्यांची ‘निशिगंधा’ ही अनुवादित कादंबरी प्रकशित होण्यापूर्वी ‘लोकमत’मध्ये लेखमालेच्या स्वरूपात प्रकाशित झाली होती.

- लेखमालेला ‘लोकमत’च्या वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

संधी दिल्याबद्दल आभार

मराठवाडा साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याचे वृत्त कळल्यावर खूप आनंद वाटला. माझ्यावर, माझ्या साहित्यावर प्रेम करणा-यांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

- प्रा. रंगनाथ तिवारी