शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रायुकाँचे दीड तास रास्ता रोको आंदोलन

By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST

जालना : दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख व अन्य ४२ मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी अंबड चौफुली येथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

जालना : दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख व अन्य ४२ मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी अंबड चौफुली येथे तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून नंतर जामिनावर त्यांची मुक्तता केली.दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे शेती पंपाचे व घरगुती वीजबील शंभर टक्के माफ करावे, पुढील सहा महिने वीज बिल वसुली थांबवावी, फळबागा वाचविण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश होता. प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे अंबड चौफुली दरम्यान चारही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात रायुकाँचे जिल्हाध्यक्ष पंकज बोराडे, जयमंगल जाधव, राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बाळासाहेब वाकुळणीकर, अ‍ॅड. संजय काळबांडे, रमेश पैठणे, राजेश राऊत, संजय दाड, नूरखान, ठाकूर, वर्षा चंद, नंदू जांगडे, सुरेश खंडाळे, बाळासाहेब तनपुरे, विश्वंभर भुतेकर, जयंत भोसले, मिर्झा अन्वर बेग, जयाजी देशमुख, शिवाजी मस्के, कल्याण सपाटे, पांडुरंग जऱ्हाड, नंदकुमार अवकाळे, नंदकुमार गिरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कदीम जालना पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)४याबाबत पत्रकारांशी बोलताना रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागासाठी ७ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केलेली असली तरी प्रत्यक्षात २ हजार कोटींचीच तरतूद केली आहे. त्यामुळे मोठ्या रक्कमेचा गाजावाजा करीत सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ४उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री एकनाथ खडसे हे तातडीने तेथे भेट देण्यास गेले. मात्र मराठवाड्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. जालन्यात रायुकाँने आंदोलन केल्यानंतर आंदोलनस्थळी महसूल विभागाच्या एकाही अधिकारी, कर्मचाऱ्याने निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रतिसाद दिला नाही, असा आरोपही पाटील यांनी केला. यावेळी राकाँचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, बाळासाहेब वाकुळणीकर, अ‍ॅड. पंकज बोराडे, अ‍ॅड. संजय काळबांडे, रमेश पैठणे आदी उपस्थित होते.