लोकमत चमू, उस्मानाबाद उस्मानाबाद तालुक्यासह परंडा शहर व काही भागात गुरूवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने झोडपून काढले़ उस्मानाबाद शहरासह वाघोली, मेडसिंगा, काजळा, वडगाव सिध्देश्वर आदी गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले़ शहरातील बांधकाम विभाग, पोलिस मुख्यालयाच्या आवारातील अनेक झाडे उन्मळून वाहनांवर पडल्याने अनेकांचे नुकसान झाले़ तर महावितरण कंपनीचे विद्युत खांब ठिकठिकाणी पडल्याने व झाड पडल्याने तारा तुटून वीजपुरवठा खंडीत झाला होता़ तालुक्यातील मेडसिंगा येथे जवळपास ३५ ते ४० जणांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ तर १४ शेळ्या ठार झाल्या आहेत़ अनेकांच्या वाहनांवर झाडेही उन्मळून पडली़ तर शेत-शिवारातील शेकडो झाडे उन्मळून पडली होती़ भूम तालुक्यातील रामकुंड येथे बुधवारच्या पावसात एक बैल ठार झाला़ कळंब तालुक्यातील येरमाळा व तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व परिसरालाही पावसाने झोडपून काढले़उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा येथे गुरूवारी दुपारी वादळी वार्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असून, भिंती कोसळल्या आहेत़ तर जगदीश साळुंके यांच्या सात व बळीराम चौरे यांच्या सात शेळ्या पत्रे पडल्याने मयत झाल्या़ तर दिलीप गावारे यांची भरडण्याची मशीन झाड पडल्याने चक्काचूर झाली आहे़ अविनाश औताडे, आबा आगळे, विलास शित्रे, विठ्ठल रोहिले, रामलिंग रणदिवे यांच्यासह जवळपास ३५ ते ४० जणांच्या घराचे नुकसान झाले़ तसेच वाघोली, वडगाव सिध्देश्वर, काजळा परिसरालाही या पावसाने झोडपून काढले़ भूम तालुक्यातील रामकुंड शिवारात वीज कोसळून अण्णा नामदेव हाके यांचा एक बैैल ठार झाला़ मंडळ अधिकारी पी़टी़जाधव, तलाठी वाय़यू़हाके यांनी घटनेचा पंचनामा केला़उस्मानाबाद येथील वीज गुलशहरात गुरूवारी दुपारी झालेल्या वादळी वारे, पावसामुळे पहिल्याच दिवशी वीज कंपनीला जोराचा झटका बसला़ सांजा रोड, पोलिस मुख्यालय परिसर, कुरणे नगर, डीसीसी बँक आदी ठिकाणी विद्युत खांब कोसळल्याने व झाडे पडून विद्युत तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत बहुतांश भागातील वीज गुल झाली होती़ रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने शहरवासियांना गैरसोयीचा सामना करावा लागला.काक्रंब्यासह सहा गावे अंधारात काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली़ तर वादळी वार्यात विद्युत खांब उन्मळून पडल्याने काक्रंब्यासह सहा गावातील नागरिकांनी रात्र अंधारात काढली़ तर घरावरील पत्रे उडून गेल्याने दगड पडल्याने तिघे जखमी झाले़ काक्रंब्यासह बारूळ, मोर्डा, काक्रंबावाडी, तडवळा, खंडाळा, वडगाव लाख, व्होनाळा, जवळगा (मे़) आदी परिसरात बुधवारी दुपारी दीड ते दोन तास वादळी वार्यासह पाऊस झाला़ यात काक्रंबा येथील भैरू साठे, लक्ष्मण माळी यांच्यासह अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले़ त्यामुळे अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले़ भागवत फुलसुंदर यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उडून गेले़ रावसाहेब क्षीरसागर यांच्या रोपवाटिकेचेही मोठे नुकसान झाले़ तर वीज कंपनीचे जवळपास २५ विद्युत पोल कोसळल्याने काक्रंब्यासह परिसरातील सहा गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली़ मोर्डा शिवारातील माणिक रामचंद्र मदने यांच्या शेतातील घरावर वीज पडून २५ पत्रे जळाले़ हिप्परगा:गारपीटलोहारा : तालुक्यातील हिप्परगा (रवा) परिसरात बुधवारी दुपारी वादळी वार्यासह आलेल्या पावसात गाराही पडल्या़ तर घरावरील पत्रे उडाल्याने एका मुलीसह तिघे जखमी झाले़ हिप्परगा रवा परिसरात बुधवारी दुपारी वादळी वार्यासह पावसाने धुमाकूळ घातला़ जवळपास ७० जणांच्या घरावरील पत्रे उडून गेले़ तर डोक्याला पत्रा लागल्याने साताप्पा होनाळकर (वय-६०), वामन हात्तीसकर (वय-४५) व शहाजी जाधव यांची १८ वर्षाची मुलगी मंगल हिस पत्रा लागल्याने जखमी झाली़ तिस उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ विद्युत पोल उखडून पडल्याने वीजपुरवठाही खंडीत झाल्याने हिप्परगासह शिक्करवाडीलाही रात्र अंधारात काढावी लागली़ तर जवळपास ३० झाडे उन्मळून पडली़ प्रशासनाने याचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे़पत्रे उडाले; भिंत पडून तिघे जखमीतामलवाडी : बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी झालेल्या वादळी पावसाचा तडाखा तामलवाडी गावाला बसला आहे. वार्यामुळे येथील दूध संकलन केंद्रावरील पत्रे उडून गेले. केंद्राच्या इमारतीची सिमेंटने बांधलेली भिंत पडल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. तसेच परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले.बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. वार्याने तामलवाडी येथील चंद्रकांत बलभीम चुंगे यांच्या मालकीचे तुळजाभवानी दूध संकलन व शितकरण केंद्राच्या भिंतीवरील पत्रे उडाली. लोखंडी पाईपसह पत्रे उडाल्याने केंद्राची सिमेंट भिंतही ढासळली. त्यामुळे तेथे बसलेल्या विलास गोविंद जगताप (वय ४८), अमोल अशोक जाधव (वय २२) महेश नितीन घाडगे (वय १२) या तामलवाडी येथील तिघांना गंभीर मार लागला आहे. वादळी वारे तसेच पाऊस कमी झाल्यानंतर या तिघांना पत्रे बाजुला करून तसेच भिंतीचा ढीग बाजुला सारून त्यातून बाहेर काढण्यात आले. यातील विलास जगताप याच्या डोक्यात वीटा पडल्याने तसेच पायावर जबर मार लागल्याने त्यांना सोलापूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघांना तामलवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच या पावसामुळे सुभाष बलभीम चुंगे यांच्या घरावरील पत्रेही उडाल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तामलवाडी, सांगवी काटी, माळुंब्रा, सांगवी मार्डी शिवारावर पाऊस झाला. मात्र पावसादरम्यान वादळी वारे सुटल्याने या भागातील घरावरील पत्रे उडाले. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)कळंब परिसरात पावसाची हजेरीकळंब : शहरासह तालुक्याच्या काही भागात गुरूवारी रात्री ८़४५ वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली़ वादळी वार्यासह पावसास सुरूवात झाल्याने ग्रामीण भागातील वीज गुल झाली होती़ कळंब तालुका व परिसरात गुरूवारी रात्री पावसास सुरूवात झाली़ शहरासह डिकसळ, ईटकूर आदी भागात रात्री उशिरा पाऊस सुरू झाला़ वादळी वार्यासह पाऊस सुरू झाल्याने ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे़ शेतीमशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे़येरमाळा परिसरातही नुकसानयेरमाळा : कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरात वादळी वार्यासह झालेल्या रोहिण्यांच्या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले असून शेतातील झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळीही वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. सुसाट्याच्या वार्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. त्यामुळे अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. रघूनाथ भांगे यांच्या दोन्ही खोल्यांवरील पत्रे या वादळी वार्याने उडाले. घरातील संसारोपयोगी वस्तू उघड्यावर पडल्या. त्यातच पावसाने घरात शिरकाव केल्याने घरातील अन्नधान्य भिजले. अत्यावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. अरुण भांगे यांच्या घरावरील पत्रेही उडून गेले. त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दुधाळवाडी पाटीजवळ असलेले हॉटेलचेही वादळी वार्याने नुकसान झाले. याठिकाणी पावसामुळे थांबलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. तसेच वाशी तालुक्यातील तेरखेडा बसस्थानकानजीक बाभळीचे झाड पडल्याने व वार्याने येथील हॉटेल व्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले. रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक जाम झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)
पावसाचा तडाखा; चाळीस घरांची पडझड
By admin | Updated: June 6, 2014 01:05 IST