शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

जुगार अड्ड्यावर राडा

By admin | Updated: April 4, 2015 00:32 IST

जालना: शहरात खुलेआमपणे मुंबई कल्याण नावाचा जुगार अड्डा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे.

जालना: शहरात खुलेआमपणे मुंबई कल्याण नावाचा जुगार अड्डा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या अडड्यावर शनिवारी दुपारी अचानकपणे सदर बाजार पोलिस ठाण्याच्या सुमारे १० ते १५ कर्मचाऱ्यांनी छापा मारला. तेव्हा पोलिस आणि बुकी चालकांत मोठा राडा झाला. फिल्मीस्टाईल झालेल्या या राड्यानंतर पोलिसांनी बुकी चालकांसह तेथील पाच जणांना अटक केली. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कडबी मंडी भागात मुंबई कल्याण नावाचा मटका जुगार अड्डा आहे. या अडड्यावर आतापर्यंत अनेक वेळा पोलिसांनी छापे टाकून बुकीचालकांवर कारवाई केलेली आहे. ती बुकी पुन्हा सुरू झाल्याने शनिवारी सदर बाजार पोलिसांच्या एका पथकाने या ठिकाणी छापा मारला. तेव्हा तेथील आरोपी व पोलिसांमध्ये चांगलाच राडा झाला. पोलिसांना धक्काबुकी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बुकी चालक कमलकिशोर बंग, दिपक कमलकिशोर बंग (दोघे रा. कालिकुर्ती), शिवलिंग छगनअप्पा वीर (रा. काद्राबाद), सुनील बाबुराव राऊत (माळीगल्ली अंबड), विष्णू माणिकराव खांडेभराड (रा. इंदिरानगर) या पाच जणांना अटक केली. त्यांच्या विरूद्ध जुगार व शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून. सायंकाळी न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणेअमलंदार गायकवाड यांनी दिली.