शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

मराठा, लिंगायत आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस सरकारनेच मार्गी लावला - अशोकराव चव्हाण

By admin | Updated: October 14, 2014 00:11 IST

शरद वाघमारे, मालेगाव काँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला व यापुढेही करु,

शरद वाघमारे, मालेगावकाँग्रेस सरकारनेच मराठा आरक्षण व लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला़ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही केंद्राकडे पाठपुरावा केला आहे व यापुढेही करु, असे माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव येथे रविवारी रात्री झालेल्या सभेत सांगितले़खा़ चव्हाण म्हणाले, दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी हरित व सिंचनक्रांती करुन जिल्ह्याची पायभरणी केली आहे़ त्यांनी विकास कामाचा पाया रचला आता आपल्या साथीने कळस चढविण्याचे काम करायचे आहे़ त्यासाठी भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यातून अमिता चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या़ या जिल्ह्याने लोकसभेमध्ये महाराष्ट्राची शान राखली आहे़ पक्षाने यापूर्वी ज्यांना मोठी पदे दिली तेच हव्यासापोटी दलबदलू झाले आहेत़ माझ्या पत्नीला मिळालेली उमेदवारी केवळ तुमच्या आग्रहावरुन दिलेली आहे, असेही ते म्हणाले़जिल्हाध्यक्ष बी़ आऱ कदम, माजी जि़ प़ अध्यक्ष माणिकराव इंगोले, तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, पिंटू स्वामी, सरपंच मंगला स्वामी आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन शंकर कंगारे यांनी केले़ भोकर: ग्रामीण भागातील समस्या मी जवळून पाहिल्या आहेत़ ज्या ठिकाणी गरज आहे़ तेथील विकास करीत हा मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मी नेहमीच बांधील आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़भोकर तालुक्यातील बटाळा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ते बोलत होते़ ते म्हणाले, या मातीचे व आमचे जुने नाते आहे़ हे मी कदापि विसणार नाही़ येथे नंदनवन फुलवण्यासाठी सिंचनाची मोठ्या प्रमाणात कामे करु़ मी तुमचा खासदार म्हणून पाच वर्षे आहे़ माझ्या सोबतीला आमदार असला की, विकासाचा मार्ग सुकर होणार आहे़ यासाठी अमिता चव्हाण यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़ यावेळी अप्पाराव देशमुख सोमठाणकर, राजा खंडेराव देशमुख, जगदिश भोसीकर, मंगाराणी अंबुलगेकर, गोविंद गौड, सिद्धेश्वर पिटलेवाड, गंगाधर बटाळकर यांची उपस्थिती होती़ दरम्यान, अमिता चव्हाण यांनी आज दिवशीतांडा, पाकीतांडा, सावरगावतांडा, वागर, पांढरवाडी या ठिकाणी बैठका घेतल्या़ विकासाबाबत आपली भूमिका विशद करताना अमिता चव्हाण म्हणाल्या, मागील पाच वर्षांपूर्वी वाडी तांड्यावर रस्ते नव्हते; पण आता या रस्त्याचे मजबुतीकरण झाले आहे़ या भागाच्या विकासासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे़ विकासाला गती देण्याची गरज आहे़ यासाठी खा़ अशोकराव चव्हाण, मी व आपण सर्वांनी मिळून काम करु़ यावेळी मंगला निमकर, कैलास राठोड, राजू पाटील दिवशीकर, माधव राठोड, इराबाई राठोड, कैलास कदम, गंगाधर राठोड, राजू हनवते, गजानन ढगे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)