जालना :ङ्क्तरेशीम उत्पादन पाण्याचे स्त्रोत पाहून सरु करावे कमीत कमी ४ हजार हेक्टरवर रेशीम उत्पादन करावे, ग्रामपंचायतीनी आणि कृषी अधीक्षक तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी रेशीम उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी दंवडीव्दारे, मोबाईल संदेशाव्दारे या माध्यमातून जनजागृती करण्याबरोबरच शेतकऱ्यांनी या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी सोमवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रेशीम उत्पादनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. सततची दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांवर येणारे नापिकीचे संकट टाळून शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून रेशिम उद्योगासारख्या व्यवसायाकडे वळावे, रेशीम उत्पादन हे शेतकऱ्यांच्या इतर उत्पादनापेक्षा अधिकचा पैसा देऊ शकतो, असे आवाहन नायक यांनी केले.या बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी राजेद्र जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दशरथ तांभाळे ,जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार, आदी संबधित अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दवंडी, मोबाईल संदेशद्वारे जनजागृती
By admin | Updated: October 27, 2015 00:19 IST