शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

३४ चारा छावण्यांचे प्रस्ताव !

By admin | Updated: August 22, 2015 23:58 IST

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने सरासरीच्या अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. यंदा तर अत्यंत गंभीर चित्र निर्माण झाले आहे.

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने सरासरीच्या अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. यंदा तर अत्यंत गंभीर चित्र निर्माण झाले आहे. आॅगस्ट महिना सरत आला असताना एकही दमदार पाऊस झाला नसल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. सदरील प्रश्न लक्षात घेवून शासनाने चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांत अकरा संस्थांनी मिळून छावण्या सुरू करण्यासाठी ३४ प्रस्ताव दाखल केले आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते. १९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील पशुधनाची संख्या ७ लाख ३७ हजार ३४७ आहे. यामध्ये ४ लाख १२ हजार १४ एवढी मोठी जनावरे आहेत. शेळ्या, मेंढ्यांची संख्या २ लाख ११ हजार ५४२ तर लहान जनावरे १ लाख १३ हजार ७९१ एवढी आहेत. मागील तीन वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे सध्या उपरोक्त पशुधन अडचणीत सापडले आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे व गारपीटीने रबीच्या पिकांना फटका बसला. त्यामुळे कडबा अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होवू शकला नाही. असे असतानाच किमान खरीप हंगामात तरी चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र प्रत्यक्षात यंदा ही पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला चाराही आता संपला आहे. दुसरीकडे जनावरे विक्रीसाठी नेली असता, त्यांना चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे अशा टंचाईच्या काळात जनावरे सांभाळायची कशी? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. एकंदरितच दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हाभरातील सुमारे सव्वासात लाखावर पशुधन अडचणीत आले आहे. कडब्याच्या एका पेंडीसाठी किमान २५ ते ३० रूपये मोजावे लागत आहेत. एवढे पैसे मोजूनही कडबा मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, भूम तालुक्यामध्ये चाऱ्यासोबतच पाण्याचा प्रश्नही अत्यंत कठीण बनला आहे. त्यामुळेच की काय, एकट्या भूम तालुक्यातून चोवीस छावण्या सुरू करण्यासाठीचे अर्ज आले आहेत. तसेच कळंब दोन, उस्मानाबाद सात, लोहारा एक आणि तुळजापूर तालुक्यातून ३ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संबंधित संस्थांनी तातडीने सविस्तर प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)