लक्ष्मण दुधाटे, पालमतालुक्यातील रावराजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार सुरू आहे. यामुळे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत गटविकास अधिकारी मधुकर कदम यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली असता तीन कर्मचारी गैरहजर होते. तालुक्यातील रावराजूर येथे रुग्णांच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मानव विकास मिशनंतर्गत लाखो रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दांडी मारण्याच्या वृत्तीमुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. एसटी बस पत्रकाच्या वेळापत्रकानुसार केंद्राचा कारभार सुरू असून याचा फटका रुग्णांना बसत आहे. या भागातील नागरिकांनी गलथान कारभाराच्या तक्रारी शासन दरबारी केल्या होत्या. वारंवार सूचना करूनही कारभारात फरक येत नव्हता. तक्रारींची संख्या वाढ असल्याने दखल घेत पं. स. चे गटविकास अधिकारी मधुकर कदम यांनी ९ जुलै रोजी अचानक भेट देऊन तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये तीन कर्मचारी कोणतीही सूचना न देता गैरहजर होते. गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अचानक भेटीमध्ये रावराजूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे. दांडीबहादर कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.वैद्यकीय अधिकारी दौऱ्यावररावराजूर केंद्राला गटविकास अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली आहे. त्यामुळे केंद्राचा कारभार कसा चालतो याचा प्रत्यय आलेला आहे. वैद्यकीय अधिकारी केंद्रात हजर नव्हते. ते पालम येथे दौऱ्यावर गेल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
प्रा.आ.केंद्राचा गलथान कारभार
By admin | Updated: July 10, 2014 00:42 IST