बाळासाहेब जाधव , लातूरकेंद्र व राज्य सरकारच्या वतीने हवामानावर आधारीत पीकविमा योजना या वर्षात नव्याने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी २,१३,४१२ हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ७४ लाख २८ हजार २५२ रुपये शेतकऱ्याने भरले होते़ त्यावर ५६ कोटी ९३ लाख ४ हजार ३१२ रुपये लातूरसाठी मंजूर झाले आहेत.केंद्र व राज्याच्या संयुक्त विद्यमाने हवामानावर आधारित पीकविम्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, मुग, उडीद या चार पिकांवर आधारीत पीकविमा भरण्याचे नियोजन केले होते़ यामध्ये ज्वारीसाठी प्रतिहेक्टरी ७२४़५० रुपये, सोयाबीनसाठी ९१२ रुपये, मुगासाठी ७२३़७५ रुपये, उडीद या पिकासाठी ७३१़२५ रुपये या प्रमाणे प्रतिहेक्टरी विमा भरला़ यामध्ये शासनाकडून ज्वारीसाठी ७२३, सोयाबीनसाठी ८९३, मुगासाठी ७२३़७५ आणि उडीद पिकासाठी ७३१़२५ याप्रमाणात रक्कम भरणे अपेक्षीत होते़ या हवामानावर आधारीत पीकविम्यासाठी ३ लाख ९७ हजार ४५९ शेतकऱ्यांनी २ लाख १३ हजार ४१२ हेक्टरवरील पिकांसाठी १७ कोटी ७४ लाख २८ हजार २५२ रुपये पीकविम्यापोटी भरली होती़ यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ३५ कोटी २५ लाख ६९ हजार ४५४ रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे भरली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यासाठी ५६ कोटी ९३ लाख ४ हजार ३१२ रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला आहे़ केंद्र व राज्य शासनाच्या वतीने हवामानावर आधारीत पीकविमा भरल्यानंतर ४५ दिवसांत शासनाकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सांगितले जात होते़ १५ आॅक्टोबर ही तारीख पीकविमा भरण्याची अंतीत तारीख होती़ २७ नोव्हेंबर उलटला तरी राज्य शासनाची रक्कम न भरल्याने शासनाची घोषणा फोल ठरली असल्याचे दिसून येत आहे़४लातूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीने या वर्षी हवामानावर आधारीत पीकविमा सुरु केला होता़ यामध्ये ३,९७,४५९ शेतकऱ्यांनी २,१३,४१२ हेक्टरवरील पिकासाठी १७,७४,२८,२५२ रुपयापर्यंतची रक्कम भरली होती़ यापोटी केंद्रशासनाच्या वतीने ५६,९३,०४,३१२ रुपयाचा पीकविमा मंजूर झाला आहे़ राज्याचा पीकविमा मंजूर होताच सदरील रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ ४हवामानावर आधारीत पिकामध्ये सोयाबीन, ज्वारी, मुग, उडीद या चार पिकासाठी शेतकऱ्यांनी पीकविम्यापोटी ५० टक्के रक्कम भरणे अपेक्षीत होते़ तर उर्वरीत ५० टक्के रक्कम केंद्र शासन व राज्य शासनामार्फत भरण्यात येणार होते़ परंतु या रकमेत फक्त केंद्रानेच रक्कम भरल्याने ५६,९३,०४,३१२ रुपये रक्कम मंजूर झाली़ परंतु राज्य शासनाने २५ टक्के निधी न भरल्याने कंपनीकडून दोन महिन्यात वाटप होणार असल्याचे सांगितले तरी राज्य शासनाचा पीकविमा निधी भरल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास अडचण येणार आहे़
५७ कोटींचा पीकविमा मंजूर
By admin | Updated: November 28, 2014 01:11 IST