शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

धर्मगुरुंच्या उपस्थितीत पट्टाभिषेक

By admin | Updated: February 3, 2015 00:58 IST

देवणी : येथील श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचा पट्टाभिषेक सोहळा सोमवारी धर्मगुरु व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला़ विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय झालेल्या

देवणी : येथील श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचा पट्टाभिषेक सोहळा सोमवारी धर्मगुरु व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला़ विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय झालेल्या देवणीतील सोहळ्यात जगद्गुरुंनी आशिर्वचन व मानव कल्याणाची प्रार्थना केली़ यावेळी श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती श्री सिद्धलिंग देवरु यांना चिन्मयदीक्षा देण्यात आली़मागील तीन दिवसांपासून देवणीत पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले़ काशीपीठाचे जगद्गुरु डॉ़चंद्रशेखर महास्वामी, गदग येथील जगद्गुरु डॉ़सिद्धलिंग महास्वामी, डॉ़शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यासह विविध धर्मगुरुंनी आशिर्वचनातून मानव कल्याणाचा व विश्वशांतीचा हितोपदेश केला़ सोमवारी सकाळी श्री गुरुलिंगेश्वर विरक्त मठाचे मठाधिपती श्री सिद्धलिंग देवरु यांना चिन्मयदीक्षा देण्यात आली़ अध्यक्षस्थानी हुलसूर मठाचे गुरु शिवानंद महास्वामी होते़ दुपारी हावगीलिंग शिवाचार्य, शंकरलिंग शिवाचार्य, बसवलिंग शिवाचार्य, संगनबसव महाराज, सिद्धलिंग महास्वामी, नीळकंठ महास्वामी, शिवमूर्ती शिवाचार्य, सिद्धरेणुका महाराज, प्रशांत देवरु, ईश्वरनंद स्वामी, शिवानंद स्वामी, मृगेंद्र देवरु, रुद्रमणी देवरु, चनमल्ला देवरु, करबसय्या स्वामी, राजेंद्र देवरु, बस्वलिंग महास्वामी, स्वामीनाथ महाराज, गुरुनजेश्वर महास्वामी, राजेश्वर महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य व हजारो भाविकांच्या उपस्थितीत पीठारोहण करण्यात आले़ यावेळी विविध धार्मिक विधी पार पडले़ त्यानंतर नूतन मठाधिपती सिद्धलिंग देवरु यांची शहरातून अड्डपालखी मिरवणूक काढण्यात आली़ या कार्यक्रमांना परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, खा़डॉ़सुनिल गायकवाड, आ़संभाजी पाटील, माजी आ़टी़पी़ कांबळे, मनोहर पटवारी, प्रकाश खंड्रे, शिवराज गंदगे, नागनाथ निडवदे, भगवानराव पाटील तळेगावकर, लिंबन महाराज रेश्मे, उपसभापती तुकाराम पाटील, सरपंच देविदास पतंगे, उपसरपंच बाबुराव इंगोले यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविक मल्लिकार्जून मानकरी यांनी केले़ सूत्रसंचालन मनोहर पटणे, रमेश मन्सुरे यांनी, तर आभार प्रा़रेवण मळभागे यांनी मानले़ (वार्ताहर)