औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील संघटना कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (क्रेडाई ) महाराष्ट्र अध्यक्षपदी (ईलेक्ट) औरंगाबादेतील नामांकित बांधकाम व्यावसायिक प्रमोद खैरनार यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी क्रेडाईच्या स्थानिक शाखेचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी वर्ष २०२१-२०२३ साठी कार्यरत राहील.
क्रेडाई महाराष्ट्र संघटनेची बैठक नाशिक येथे २९ आणि ३० जानेवारीला घेण्यात आली. या बैठकीत संघटनेच्या माजी अध्यक्षांच्या सल्लागार समितीने ही निवड केली.
या सल्लागार समितीमध्ये सतीश मगर, राजेन्द्रसिंग जबिंदा, जितेंद्र ठक्कर, किशोर चांडक, अनंत राजेगावकर, शांतीलाल कटारिया व राजीव पारीख यांचा समावेश होता.
प्रमोद खैरनार आणि नरेंद्रसिंग जबिंदा यांच्या राज्य कार्यकारिणीवरील निवडीबद्दल क्रेडाई, औरंगाबादचे पदाधिकारी तसेच संघटनेच्या सर्व सदस्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
फोटो
प्रमोद खैरनार आणि नरेंद्रसिंग जबिंदा