शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

घनसावंगी मतदार संघात चौरंगी लढतीची शक्यता

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

तुळशीदास घोगरे, घनसावंगी लोकसभा निवडणुकीनंतर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेमध्ये संजय जाधव या महायुतीच्या उमेदवारास मताधिक्य

तुळशीदास घोगरे, घनसावंगीलोकसभा निवडणुकीनंतर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभेमध्ये संजय जाधव या महायुतीच्या उमेदवारास मताधिक्य मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ तर शिवसनेत उत्साहाचे वातावरण आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात २६३८६ हजारांच्या मताधिक्यामुळे शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामतदारसंघात तीन तालुक्यांची गावे आहेत. अंबड तालुक्यातील चार सर्कल, जालन्यातील साडेतीन सर्कल व संपूर्ण घनसावंगी तालुका असा हा मतदारसंघ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत टोपे यांना सर्वच सर्कलमधून मताधिक्य मिळाले. मात्र, त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. लोकसभा निवडणुकीत न भूतो ना भविष्य अशा प्रकारे महायुतीस मताधिक्य मिळाल्यामुळे प्रत्येक गावा गावात विधानसभेत काय होणार? यासंदर्भात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. यावेळी काँगे्रस आघाडीकडून विद्यमान आमदार तथा पालकमंत्री राजेश टोपे उमेदवार असतील यात काही शंका नाही. मात्र, जिल्हा परिषदेतील पिछेहाट आणि लोकसभेत या मतदारसंघातून घटलेले मताधिक्य यामुळे उमेदवारी बदलून आपल्याला द्यावी, अशी मागणी किर्ती उढाण या पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे कळते. जि.प. निवडणुकीत तिकिट न मिळाल्यामुळे श्याम उढाण व किर्ती उढाण या पती-पत्नीनी बंडखोरी केली. यात श्याम उढाण विजयी झाले. टोपे आणि उढाण यांच्यात वितुष्ट आले आहे. श्याम उढाण हे महायुतीच्या कार्यक्रमांमधून व्यासपीठावर झळकल्याने त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महायुतीकडून माजीमंत्री अर्जुन खोतकर, माजी आ. शिवाजीराव चोथे, पंडितराव भुतेकर हे इच्छुक आहेत. परंतु खोतकर हे जालन्यातून रिंगणात उतरल्यास टोपेंच्या विरोधात कोणता उमेदवार कोण असेल याची चर्चा रंगत आहे. चोथे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक गावात जावून महायुतीचा प्रचार केला. मताधिक्य मिळवून देण्यात त्यांना यश आले. या पार्श्वभूमीवरच विधानसभाही आपल्याला सोपी जाईल, अशी आशा ते बाळगून आहेत. तसे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘इंजिन’ही धावणारलोकसभा निवडणुकीत कुठेच न दिसणारे जिल्हाध्यक्ष सुनील आर्दड हे यावेळेस या विधानसातून उभे राहण्याची दाट शक्यता आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. गाव तेथे शाखा स्थापन करून कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले आहे. आंदोलन, एक्सप्रेस कालवा, रास्ता रोको यावरून ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे. ‘सायकल’ही शर्यतीतया मतदारसंघात माजी आ. विलासराव खरात यांचा दबदबा आजही कायम आहे. यावेळेस ते स्वत: रिंगणात उतरणार का? याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. टोपे यांना पराभूत करणे ऐवढे सोपे नाही. एखादी तगडी लाटच त्यांना पराभूत करू शकते, अशी चर्चा आहे. मोदी लाट विधानसभा निवडणुकीपर्यंत किती टिकते यावर बरेच काही अवलंबून आहे. या मतदारसंघात येत्या निवडणुकीत महायुती, राष्ट्रवादी आघाडी, सप, मनसे अशी चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. रा.काँ.राजेश टोपे104206शिवसेनाअर्जुन खोतकर80899रिपाइं (ए) राजेंद्र हिवाळे2165इच्छुकांचे नाव पक्षराजेश टोपेराष्ट्रवादी काँग्रेसअर्जुन खोतकरशिवसेनाशिवाजीराव चोथेशिवसेनालक्ष्मण वडले शिवसेनापंडितराव भुतेकरशिवसेनाकिर्ती उढाणराष्ट्रवादी काँग्रेसरवींद्र तौर काँग्रेसविष्णू कंटुलेकाँग्रेसविलासराव खरातस.प.सुनील आर्दडमनसेआत्माराम तिडकेमनसेलोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे खा. संजय जाधव यांना २६ हजार ३८६ एवढे मताधिक्य मिळाले. शिवसेनेच्या पाठीशी असलेला हा मतदार संघ यावेळी कोणाला कौल देतो हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.