शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

शासकीय कार्यक्रमाला राजकीय स्वरूप

By admin | Updated: February 4, 2015 00:42 IST

माजलगाव : येथील पोलीस उपविभागीय अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारत कामाच्या भूमिपूजन समारोहाच्या पत्रिकेत विनित म्हणून चक्क जिल्हाधिकारी

माजलगाव : येथील पोलीस उपविभागीय अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारत कामाच्या भूमिपूजन समारोहाच्या पत्रिकेत विनित म्हणून चक्क जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचीच नावे टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपा जिल्हा प्रमुख रमेश पोकळे यांचे नाव टाकण्यात आले आहे. शासकीय कार्यक्रमाला राजकीय स्वरूप मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.माजलगाव येथील केसापुरी कॅम्प येथे उपविभागीय पोलीस अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन माजलगाव या इमारतीचा भूमिपूजन समारंभ बुधवारी सकाळी सव्वादहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.या पत्रिकेत उद्घाटक म्हणून गृहराज्यमंत्री राम शिंदे तर अध्यक्ष म्हणून खा. प्रीतम मुंडे यांचे नाव टाकण्यात आले आहे. दरम्यान सदरील काम हे ५५ लाख रुपयांचे तर ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी १२ लाख रुपये खर्च होणार आहे. या कामाच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांचे नाव प्रमुख पाहुण्यात पाहिजे असताना त्यांची नावे विनित मध्ये टाकण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी म्हणाले की, भूमिपूजनाच्या पत्रिकेत चुक आढळून आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुपारनंतर भूमिपूजन समारंभाच्या पत्रिकेत बदल करण्यात आला आहे. (वार्ताहर)माजलगाव येथे गृहराज्यमंत्री यांच्या हस्ते दोन शासकीय इमारतींचे भूमिपूजन होणार आहे. बांधकाम विभागाच्या वतीने छापण्यात आलेल्या पत्रिकेत जिल्हाधिकारी यांचे नाव विनितमध्ये टाकण्यात आले आहे. या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, सदरील कार्यक्रमाची माहिती मला नाही. जिल्हाधिकारी असल्याने माझे नाव कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यामध्ये असायला हवे होते. त्यामुळे माझे नाव विनितमध्ये टाकण्याचा काही संबंध येत नाही, असे झाले असेल तर हा प्रकार चुकीचा आहे.