निलंगा : भावाच्या मदतीने नात्यातीलच एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांना शनिवारी निलंगा न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरारच आहेत़ निलंगा येथील विलास जाधव याने आपल्याच नात्यातील एका २० वर्षीय तरुणीस भावांच्या मदतीने पुणे येथे नेले़ त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरीने बलात्कार केला़ दोन दिवसांनी पीडित तरुणी निलंगा शहरात त्यांच्या राहत्या घरी आली़ या ठिकाणी विलास याने धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला़ याप्रकरणी पीडित तरुणीने निलंगा पोलिस ठाणे गाठून शुक्रवारी रात्री उशिरा तक्रार दिली़ या तक्रारीनुसार पोलिसांनी मुख्य आरोपी विलास जाधव याच्यासह त्यास मदत करणार्या इतर ४ भावंडांवर गुन्हा दाखल केला़ यापैकी विलास जाधव व राम जाधव यांना तात्काळ अटक करण्यात आली़ त्यांना शनिवारी निलंगा न्यालयात हजर करण्यात आले़ यावेळी दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़ त्यानुसार दोन्ही आरोपींची रवानगी पोलिस कोठडी करुन पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे़ या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आलेले आरोपी धनराज जाधव, सुरेश जाधव, दिलीप जाधव हे अजूनही फरार आहेत़ निलंगा पोलिसांचे एक पथक या आरोपींच्या मागावर आहे़ (वार्ताहर)
‘त्या’ दोघांना पोलिस कोठडी
By admin | Updated: May 10, 2014 23:53 IST