शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला

By admin | Updated: September 18, 2014 00:39 IST

जालना : जिल्ह्यात कपाशीवर फुलकिडे, सोयाबीनवर चक्रीभुंगा तर मोसंबी व डाळींबावर फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

जालना : जिल्ह्यात कपाशीवर फुलकिडे, सोयाबीनवर चक्रीभुंगा तर मोसंबी व डाळींबावर फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी जोमात आलेले पीक पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी गेल्या आठवड्यात जिल्ह्यात विविध भागात पिकांची पाहणी केली. अभ्यासाअंती पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात आले. पुणेगाव, पोकळ वडगाव, सोनदेव, पळसखेडा पिंपळे, शेलगाव आदी गावातील भेटींच्या आधारे खालील उपाययोजना सुचविल्या आहेत.जिल्ह्यात उशिराच्या मान्सूनमुळे कापसाची लागवड जुलैमध्ये झाल्याचे आढळते. सुरूवातीचा कमी पाऊस व उशिरा लागवड, उशिरा दिलेली खते यामुळे पहिल्या दोन महिन्यांत कापसाची वाढ कमी झाल्याचे आढळून आले. नंतर सततचा पाऊस व मिळालेली उघाड व पडलेले ऊन यामुळे कापूस पिकावर फुलकिड्यांचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव जास्त झाल्याचे शास्त्रांचे म्हणणे आहे. ही किड अतिशय लहान व नाजुक असते. ही १ मि.मी. पेक्षा कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर असते. फुलकिडे आणि पिले कापसाच्या पानामागील भाग खरडवून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात. प्रथम तो भाग पांढुरका व नंतर तपकीरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळ्या आकसतात व झाडाची वाढ खुंटत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी पुढीलपैकी कुठलेही एक किटकनाशक योग्य प्रमाणात वापरून फवारणी करावी. अ‍ॅसिटामॅप्रीड २० टक्के, २ ग्रॅम किंवा थायोमेथॅक्झॉन २५ टक्के, २.५ ग्रॅम किंवा फिप्रिनिल ५ टक्के २० मि.ली. किंवा मिथील डेमॅटॉन २५ टक्के ८ मि.ली. किंवा अ‍ॅसिफेट ७५ टक्के २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.सोयाबीनची पेरणी जुलैमध्ये झाल्यामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सोयाबीनवर खोड पोखरणारी प्रमुख कीड म्हणून चक्रीभुंग्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. या किडीचा भुंगा फिकट तपकीरी रंगाचा ७ ते १० मि.मी. लांबीचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश व अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात. या किडीची अंडी पिवळसर लांबट आकाराची असून पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. या किडीच्या अळीमुळे पिकांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन खापा करते व खालच्या खापेजवळ अंडी घालण्यासाठी तीन छिद्र पाडते. खोडावर खापा केल्यास दोन ते तीन दिवसाने वरचा भाग सुकण्यास सुरूवात होते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जात असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. किडीच्या नियंत्रणासाठी औषधी फवारणी योग्य प्रमाणात करावी. डायमेथॉएट ३० टक्के १० मी.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी १६ मि.ली. किंवा लॅम्बडा साहलोथ्रीन ५ टक्के ६ मि.ली. किंवा प्रोफिनोफॉस ५० टक्के २५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.डाळींब व मोसंबी पिकावर अंबिया बहाराची फळे काढणीस तयार होत आहेत. हा पतंग रात्रीच्या वेळेस फळातील रस शोषण केल्यानंतर फळे गळून पडतात. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे (डास) एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन त्यासाठी सुरूवातीला खाली प्रादुर्भावग्रस्त पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. गुळवेल, वासनवेळ यासारख्या तण काढावेत. किटकांचा प्रसार थांबविण्यासाठी बगीचा स्वच्छ ठेवावा, बागेच्या भोवताली सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धूर करावा, प्रकाश सापळ्याचा वापर करावा व विषाचे अमिष तयार करून झाडाला बांधावेत. मेलॅथियॉन + फळाचा रस याचे द्रवण करून बाटलीमध्ये भरून ही बाटली झाडाला बांधावी. (वार्तहर)