शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: June 13, 2014 00:32 IST

कडा: बीड- धामणगाव- अहमदनगर या राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.

कडा: बीड- धामणगाव- अहमदनगर या राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. यामुळे या मार्गावर वाहनांची संख्याही रोडावल्याने परिसरातील व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. २००० साली सा.बां. विभागाने बीड-धामणगाव- अहमदनगर या राज्यरस्त्याचे डांबरीकरण केले. हा रस्ता चांगला झाल्याने व येथून रहदारी वाढल्याने रस्त्यालगत अनेक ठिकाणी हॉटेल, ढाबे, रसवंतीगृह आदी व्यवसाय ग्रामस्थांनी सुरू केले. या रस्त्यावरून रहदारी वाढल्याने रस्त्यालगतचे व्यवसायही भरभराटीस आले होते. विशेष म्हणजे या रस्त्यावर एकही टोलनाका नसल्याने येथून वाहनचालकही जाणे पसंत करीत. यामुळे येथे वाहनांची रात्रंदिवस वर्दळ असायची. हा राज्यरस्ता झाल्याने या रस्त्यावरील दौलावडगाव, कारखेल, मसोबावाडी, घाटापिंप्री, धामणगाव, डोईठाण, पांढरवारी, कोतन, अंमळनेर, डोंगरकिन्ही, लिंबादेवी आदी ठिकाणी बाजारपेठही बहरास आल्या. या परिसरातील अनेक शेतकरी आपला माल बीड, अहमदनगर आदी ठिकाणी घेऊन जाऊ लागले. यामुळे त्यांचेही जीवनमान उंचावले. तसेच राज्य महामार्ग झाल्याने इतर व्यवसायही भरभराटीस आले. असे असले तरी या रस्त्यामुळे झालेल्या प्रगतीस अवघ्या दोन ते तीन वर्षातच ब्रेक लागला. या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने येथून प्रवास करणे जिकिरीचे होऊ लागले. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होऊ लागले तर प्रवाशांनाही त्रास होऊ लागला. यामुळे येथून प्रवास करणे प्रवासी टाळू लागले. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहने आष्टी, जामखेड मार्गे नगरकडे जाऊ लागली. नगर- पाथर्डी - गेवराई हा ही रस्ता महामार्ग झाला. त्यामुळे बीड- धामणगाव- नगर रस्त्यावरील वाहतूक कमालीची घटल्याचे दादासाहेब जगताप यांनी सांगितले. या रस्त्यावर वळण व पूलही धोकादायक आहेत. रस्त्यावरील खड्डयासह पुलांचीही दुरूस्त करण्यास सा.बा. विभागाकडून हयगय होत आहे. गंभीर बाब म्हणजे चौदा वर्षात एकदाच येथे दुरूस्तीचे काम झाले आहे. परिणामी येथील वाहतूक रोडावल्याने व्यवसाय, शेतकरी अडचणीत आले आहेत.या संदर्भात सा.बां. विभागाचे उपअभियंता सुंदर पाटील म्हणाले, रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजविण्यात येतील.