शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

‘सीव्हील’मधील रुग्ण वाऱ्यावर!

By admin | Updated: January 13, 2015 00:12 IST

उस्मानाबाद : गत महिन्यापासून परिक्षेसह इतर कारणास्तव रजा घेण्याचे जणू सत्रच सुरू केले आहे़ गत महिन्यात १० वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले होते़

उस्मानाबाद : गत महिन्यापासून परिक्षेसह इतर कारणास्तव रजा घेण्याचे जणू सत्रच सुरू केले आहे़ गत महिन्यात १० वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले होते़ यातील काही वैद्यकीय अधिकारी रुजू झाले असून, सद्यस्थिती जवळपास सहा वैद्यकीय अधिकारी रजेवर आहेत़ त्वचारूग्णासह इतर विभागात पर्यायी व्यवस्था नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात गोळ्या-औषधे देवून रूग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे़ एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी रजेवर गेल्याने रूग्णालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़येथील जिल्हा रूग्णालयात शहरासह तालुका, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रूग्ण उपचारासाठी येतात़ रूग्णालयात आलेल्या रूग्णांची विविध कारणास्तव होणारी हेळसांड ही नित्याचीच बाब बनली आहे़ मयताचे शवविच्छेदन करण्यास होणारा विलंब असो अथवा बाह्य रूग्ण विभागाच्या कालावीत गायब होणारे काही वैद्यकीय अधिकारी असो यामुळे रूग्णांसह नातेवाईकांची हेळसांड होत आहे़ तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जयपाल चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात परिक्षेसाठी जाणाऱ्या व इतर कारणास्तव रजा मागितलेल्या तब्बल १० वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकाचवेळी रजा मंजूर केली होती़ एकाचवेळी दहा वैद्यकीय अधिकारी रजेवर गेल्यानंतर वरिष्ठांना उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून रूग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे़ विशेष म्हणजे त्वचारोग विभागात पर्यायी व्यवस्था नसल्याने गत पंधरा दिवसांपासून येथे उपचारासाठी येणारे रूग्णांची हेळसांड होत आहे़ अंगावरील डाग, पुरळ, खाज सुटणे, चेहऱ्यावरील डाग, गचकरण आदी विविध आजाराचे रूग्ण वैद्यकीय अधिकारी नसल्याने हैराण झाले आहेत़ डॉ़ रणदिवे, डॉ़ कानडे दाम्पत्य, डॉ़ बागल, डॉ़ दापके हे वैद्यकीय अधिकारी गत काही दिवसांपासून रजेवर आहेत़ तर रजेवर गेलेले काही वैद्यकीय अधिकारी गत दोन दिवसापूर्वी रुजू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)जिल्हा रूग्णालयातील सीटीस्कॅन मशीन जवळपास वर्षभरापासून विविध कारणांनी बंद आहे़ चार दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातातील जखमींच्या तपासणी करतानाही येथील यंत्रणेसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या़ जिल्हा रूग्णालयातील इतर अनेक यंत्रणा बंद असून, याचा थेट फटका रूग्णांना बसत आहे़ ही परिस्थिती पाहता सीटीस्कॅनसह इतर यंत्रणा सुरू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे़त्वचारोग विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था नाही़ मात्र, इतर विभागात उपलब्ध कर्मचाऱ्यांद्वारे रूग्णांची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे़ रजेवर असलेले काही वैद्यकीय अधिकारी रुजू झाले असून, इतरही लवकरच रुजू होणार असल्याचे प्ऱ शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़