शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पैठण नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चुरस

By admin | Updated: July 9, 2014 00:52 IST

पैठण : पैठण नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दि. १७ रोजी नगर परिषद सदस्यांची विशेष सभापी उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.

पैठण : पैठण नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दि. १७ रोजी नगर परिषद सदस्यांची विशेष सभा न. प.च्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. दुपारी ३ वा. घेण्यात येणाऱ्या विशेष सभेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दि. ९ ते १० च्या दुपारी ३ वाजेपर्यंत मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे दाखल करण्याची मुदत आहे. दि. १० रोजी दुपारी ३ वाजेनंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून दि. १५ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. दि. १६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दि. १७ रोजी विशेष सभेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले पैठणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले असल्याने या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे बहुमत असलेल्या या नगर परिषदेत नगराध्यक्षपद कायम राखण्यासाठी काँग्रेस सज्ज असून यंदा शिवसेनाही नगराध्यक्ष पदासाठी सरसावली असल्याने या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. अंतिम बाजी कोण मारणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)पक्षीय बलाबलपैठण नगर परिषदेत सदस्यांची संख्या २० एवढी आहे. यात काँग्रेस १०, राष्ट्रवादी-२, शिवसेना-४, शहर विकास आघाडी -२, भाजपा-०२ असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादीच्या २ सदस्यांपैकी एका सदस्यास ओढून काँग्रेसने पहिल्या अडीच वर्षात काँग्रेसचा नगराध्यक्ष बनविला होता. त्यामुळे काँग्रेसकडे ११ सदस्यांचे बहुमत आहे.