प्रसाद आर्वीकर , परभणी या लोकसभा मतदारसंघ निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीसह इतर पक्षांच्या उमेदवारांनीदेखील आपला प्रभाव दाखविला. बहुजन समाज पार्टी तिसर्या क्रमांकावर राहिली असून या पक्षाला ३३ हजार ७१६ मते मिळाली. या मतदारसंघामध्ये एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात ६ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या मतांवर सर्वांचेच लक्ष लागले होते. बसपाचे गुलमीर खान यांनी ३३ हजार ७१६ मते घेत तिसर्या क्रमांकावर राहिले. त्याचप्रमाणे सीपीआयचे राजन क्षीरसागर यांनी १२४०४, सपाचे अॅड. अजय करंडे यांनी ५५०७, आंबेडकर नॅशनल कॉँग्रेसचे अशोक दुधगावकर यांनी १८६९, भारिप बहुजन महासंघाचे एम.डी.इलियास एम.डी.अमीर यांनी ८००६, बहुजन मुक्ती पार्टीचे बबन मुळे यांनी ५८३६ तर वेलफेअर पार्टी आॅफ इंडियाचे सय्यद अब्दुल रहीम यांनी २४९२ मते घेतली. या सर्व पक्षांच्या मतांची गोळाबेरीज केली तर ४३५१० एवढी होते. या निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या सहा अपक्षांनीहीदेखील ३३७५० मते घेतली आहेत. निसार सुभान खान पठाण यांनी १२३४१ एवढी मते घेतली आहेत. बहुजन समाज पार्टी, इतर पक्ष आणि अपक्ष या सर्वांच्या मतांची बेरीज १ लाख १४ हजार ९६९ एवढी आहे. ही मते निश्चितच या निवडणुकीत आपला प्रभाव दाखवून गेली. आपकडून निराशा आम आदमी पार्टी पक्षाने दिल्ली लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशामुळे लोकसभा निवडणुकीतही या पक्षाच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु परभणी लोकसभा मतदार संघात आप या पक्षाला ४ हजार ४४९ एवढी मते मिळाली आहेत. निवडणुकीतील १७ उमेवारांमध्ये हा पक्ष १२ व्या स्थानावर राहिला आहे. ‘नोटा’ला चौथ्या स्थानाची मते या निवडणुकीत प्रथमच मतदारांना नकारात्मक मत देण्याचा अधिकार मिळाला होता. तब्बल १७ हजार ४९६ मतदारांनी नकारात्मक मतदान केले. एकूण मतांची तुलना केली असता नोटा या बटनला चौथ्या स्थानाची मते मिळाली आहेत.
बसपासह इतर पक्षांनीही दाखविला प्रभाव
By admin | Updated: May 17, 2014 00:58 IST