शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

अडत बाजारात कांदा गडगडला

By admin | Updated: July 15, 2016 01:06 IST

औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली

औरंगाबाद : जाधववाडीतील कृउबा समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात बेमुदत बंदनंतर गुरुवारी पहाटे फळ-पालेभाज्यांच्या अडत व्यवहाराला सुरुवात झाली. मात्र चोहोबाजूंनी १५० टन कांद्यांची आवक झाल्याने भाव गडगडले. हर्राशीमध्ये क्विंटलला २५० ते ७०० रुपये नीचांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. कारण कांद्याचा मोठा साठा कांदाचाळीत शिल्लक असून, बाजारात मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. कांदा ६ टक्के अडत देऊन खरेदीदारांनी खरेदी केला. मागील चार दिवसांनंतर पुन्हा एकदा फळे-पालेभाज्यांच्या अडत बाजारात पहाटे हर्राशीचा आवाज कानावर पडला. सर्वप्रथम अडत्यांनी शेतकरी व खरेदीदारांना एकत्र बोलावले व अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करावी, असा राज्य सरकारचा अध्यादेश असल्याचे स्पष्ट केले. अडत देण्यास जे खरेदीदार तयार होते, त्यांनीच हर्राशीत भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक अडत्याच्या दुकानासमोर हर्राशी करण्यात आली. चार दिवसांनंतर अडत सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला. चातुर्मासाला सुरुवात होत आहे. या काळात अनेक जण कांदा खात नाहीत. त्यामुळे पुढील चार महिने कांद्याचा उठाव कमी राहणार असल्याने खरेदीदारांनी हर्राशीतून हात आखडता घेतला. परिणामी मागील आठवड्यात ३०० ते ८०० रुपये क्विंटलप्रमाणे विक्री झालेला कांदा शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५० ते १०० रुपये कमी भावात विकावा लागला. अजून शेतकऱ्यांकडे कांदाचाळीत मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक असून, येत्या दीड महिन्यानंतर कर्नाटकमधील नवीन कांद्याची आवक सुरूहोईल. तेव्हा कांद्याचे भाव आणखी कमी होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या दीड महिन्यात आपल्याकडील कांदा विक्री करावा लागणार आहे.कांद्याला ५०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळतील, या आशेने शेतकरी आले होते. मात्र हर्राशी कमी भावात झाल्याने शेतकरी संतापले होते. अडत खरेदीदारांकडून वसूल केल्यामुळेच खरेदीदारांनी कमी बोली लावून कांद्याचे भाव पाडले, असा आरोप शेतकरी करीत होते. अन्य फळ, पालेभाज्यांचीही चांगली विक्री झाली.