तक्रार बेदखल : जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा सल्लाचंद्रपूर : येथील गोंडकालीन पुरातन किल्ल्याची तोडफोड करण्यात आली. अतिक्रमणामुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे एनासियंट अँड आर्कियोलॉजीकल साईटस् अॅन्ड रिमेन्स अॅक्ट १९५८ अधिनियमानुसार किल्ल्याचे नुकसान व त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणासाठी दोषी असलेले पुरातत्त्व अधिकारी, आमदार व मनपा आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली होती. मात्र तक्रारीवरून २० दिवस लोटल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याउलट पोलीस यंत्रणेने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी, असे पत्र देऊन राजेश बेले यांची बोळवण करण्यात आली आहे. इरई व झरपट नदीच्या संगमावरील भूभागावर वसलेल्या चंद्रपूर शहराची ख्याती पुरातन काळापासून आहे. शहरात दिमाखाने उभा असलेला किल्ला गोंडराजांनी १४६१ ते १५७२ या काळात बांधलेला आहे. पुरातन वास्तुकलेचा उत्कृ ष्ठ नमुना असलेला देखणा किल्ला व त्याचे परकोट असामाजिक तत्त्वांच्या कृत्याला बळी पडला आहे. काही नागरिकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी किल्ल्याच्या परकोटाची तोडफोड केली तर कुणी किल्ल्याच्या भिंतीवर घर बांधले. काहींनी घर बांधण्यासाठी किल्ल्याची भिंत तोडली. काही ठिकाणी किल्ल्याचा परकोट तोडून २० फुटांचा रस्ता तयार केला. महानगरपालिकाही या विषयात मागे नाही. मनपाच्यावतीने दोन ठिकाणी किल्ल्याच्या जागेवर शौचालय बांधले. केंद्र सरकारने पुरातन वास्तूचे जतन व्हावे, यासाठी विशेष अधिनियम तयार केला. त्यानुसार तक्रारीनंतर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा सल्ला देण्यात आले.
शहर बसच्या एक हजार फेऱ्या
By admin | Updated: March 14, 2016 00:54 IST