उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी फाट्याजवळील पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून पलटी झाली़ या अपघातात एकजण ठार झाला असून, सातजण जखमी झाले़ हा अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडला असून, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंंद करण्यात आली आहे़ जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ पोलिसांनी सांगितले की, आंध्रप्रदेशातील गोदमपुट्टा येथील बापीरेड्डी गोपालरेड्डी हे नवीन कार घेतली होती़ नवीन कार घेतल्याने ते कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते़ दर्शनानंतर कारमधून (क्ऱतात्पुरता पासिंग क्ऱए़पी़१०-व्ही़ई़टी़आऱ७२१२) गावाकडे परतत होते़ आळणी फाट्याजवळील वळणावर चालक मधुसुदन रेड्डीसनीरेड्डी याचा ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली़ या अपघातात गोपालरेड्डी समेरेड्डी (वय-५२) यांचा मृत्यू झाला़ तर मदुसुदन रेड्डी, शोभा रेड्डी, मंजूला रेड्डी, शारदा रेड्डी, याक्षमा सायरेड्डी, विश्ववर्धन रेड्डी, भुवन रेड्डी हे सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ या प्रकरणी बापीरेड्डी गोपालरेड्डी यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
अपघातात एक ठार, सात जखमी
By admin | Updated: June 28, 2014 01:16 IST