शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अधिकाऱ्यांचेही आंदोलन

By admin | Updated: August 6, 2014 02:36 IST

औरंगाबाद : कर्मचाऱ्यांपाठोपाठ महसूल विभागातील अधिकारीही मंगळवारपासून संपात उतरले.

औरंगाबाद : कर्मचाऱ्यांपाठोपाठ महसूल विभागातील अधिकारीही मंगळवारपासून संपात उतरले. नायब तहसीलदारांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्या वेगळ्या मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले. दुसरीकडे महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग चौथ्या दिवशीही सुरूच राहिला. परिणामी महसूल विभागाचे कामकाज शंभर टक्के ठप्प झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात आज केवळ जिल्हाधिकारी विक्रम कुमार आणि अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे हे दोघेच हजर होते. कर्मचाऱ्यांचाही संप सुरू असल्यामुळे संपूर्ण कार्यालय ओस पडले होते. परिणामी सामान्यांचे हाल झाले. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तसेच परतावे लागले. नियोजित सुनावण्या रद्द झाल्या. प्रमाणपत्र वितरणाचे काम बंद झाले.महसूल कर्मचारी संघटनेने शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. नायब तहसीलदारपदाचा ग्रेड पे वाढवून द्यावा, लिपिकाचे पदनाम बदलावे, नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरावीत, कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती लागू करावी इ. मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाचा आज चौथा दिवस होता. त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज आधीच जवळपास ८० टक्के ठप्प झाले होते. त्यातच सीआरपीसी कलम १५३(३) मध्ये उपाययोजना करण्याची मागणी मान्य न झाल्याने राज्य तहसीलदार/नायब तहसीलदार संघटना या अधिकाऱ्यांच्या संघटनेने आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले. संघटनेने आधीच ५ आॅगस्टपासून काम बंदचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळपासून नायब तहसीलदारांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी काम बंद केले. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. सामान्य प्रशासन, पुरवठा, गृह, महसूल, रोहयो, करमणूक कर, भूसंपादन, अकृषिक, संजय गांधी निराधार योजना, राजशिष्टाचार, नगरपालिका प्रशासन, पुनर्वसन आदी सर्वच शाखांमध्ये एकही अधिकारी, कर्मचारी हजर नव्हता.