शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

आकडे टाका; वीज वापरा !

By admin | Updated: December 22, 2014 23:38 IST

राजेश खराडे, बीड ‘कुणीही या अन् आकडा टाकून वीज घ्या’ अशीच काहीशी अशीच स्थिती महावितरण कंपनीची झाली आहे. बीडमध्ये केवळ ग्राहकच आकडे टाकून वीज वापरतात असे नाही

राजेश खराडे, बीड‘कुणीही या अन् आकडा टाकून वीज घ्या’ अशीच काहीशी अशीच स्थिती महावितरण कंपनीची झाली आहे. बीडमध्ये केवळ ग्राहकच आकडे टाकून वीज वापरतात असे नाही. बीड पालिकाही आता यात मागे नाही. अ‍ॅटोमॅटीक टाईमर स्वीच नादुरूस्त झाल्यामुळे थेट वीज जोडणी घेतली आहे. त्यामुळे वीज वापराची नोंद होत नाही. ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टींगमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.दिवस मावळताच दिवे आॅन तर उजेडताच आॅफ करण्यासाठी शहरातील २२३ रोहित्रांवर ‘टाईमर स्वीच’ बसविण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून हे स्वीच बंद अवस्थेत असल्यामुळे येथील मीटर अवलंबून न राहता नगरपालिकेने मधला मार्ग काढत थ्री फेज वरील कनेक्शन डायरेक्ट डिस्ट्रक्शन बॉक्स मधून सर्व्हिस वायरच्या सहाय्याने विद्युत खांबावरील तारांना जोडून वीज चोरी दिवसाढवळ्या केली जात आहे. याचा फटका महावितरण कंपनी व ग्राहकांना बसत आहे. घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक व शेतीपंपधारकांना वीजवसुली बाबत सातत्याने तगादा लावला जात आहे. अतिरीक्त विजबिल झाल्यास मीटर जप्ती करुन शहरातील विद्युतप्रवाह बंदही करण्यात येत आहे. मात्र नगरपालिकेकडून विज चोरी तर होतच आहे शिवाय दिवसाही पथदिवे हे सुरूच ठेवले जात असल्याबाबत ‘लोकमत’ ने स्टिंग आॅपरेशनकेले आहे. विद्युत चोरी करून शहरातील गणेश नगर, शहेंशहा नगर, सहयोग नगर, गुजराती कॉलनी आदी भागातील पथदिवे हे दिवसाच सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत बीड अर्बनच्या वतीने अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून न.प.च्या मुख्यधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासोबत वेळोवेळी बैठका झाल्या आहेत. अद्यापर्यंत कोणतिही ठोस कारवाई झालेली नाही. मध्यंतरी महावितरण कंपनीने वसुलीबाबत कडक धोरण अवलिंबल्यामुळे तरी नगरपालिकेकडून महिन्याकाठी ८ लाख बिलापोटी ७ लाख रुपयांची वसुली केली जात आहे मात्र न.प. कडे १५ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. शिवाय त्यावरील १८ टक्के व्याज हे वेगळच त्यामुळे थकबाकीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहरात पथदिव्यांकरिता जवळपास २२३ ठिकाणी कनेक्शन देण्यात आले आहेत. नोटिसावर नोटिसानगरपालिकेने विद्युत खांबावर टाईमर स्वीच बसवून घ्यावेत याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. तर थकबाकीबाबत नोटिसाही देण्यात आल्या आहेत. मात्र महावितरणच्या कारवाईचे गांभीर्य हे नगरपालिकेलाही चांगलेच माहित असल्याने त्याकडे दुर्लंक्ष होत आहे.४शहरातील २२३ रोहित्रांवर पथदिव्यांकरिता ‘टाईमर स्वीच’ बसविण्यात आले होते. ४मात्र काळाच्या ओघात या स्वीचमध्ये बिघाड झाला आहे. ४याची दुरूस्ती न करता त्या-त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी अनाधिकृतपणे डायरेक्ट विद्युत तारांवरून कनेक्शन घेतले असल्याचे समोर आले आहे.४त्यामुळे महिन्याकाठी महावितरणालाच भुर्दंड सहन करावा लागत आहे.सर्वसामान्य ग्राहाकंकडून वसुली अन्यथी मीटर जप्तीचे सुत्र अविलंबणारे महावितरण नगरपालिकच्या बाबतीत ऐवढी नरमाईची भुमिका का घेत आहे? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पथदिव्यांच्या विज बिलापोटी न.प.कडे १५ कोटी ४६ लाख रुपयांची बाकी आहे. शिवाय विजचोरीतून लागणारा चुना वेगळाच. सहयोग नगरात पथदिवे आॅनचशहराच्या मध्यवर्ती असलेल्या सहयोग नगरातील सर्वच पथदिवे दिवसाही सुरू होते. अतिरीक्त थकबाकीच्या नावाखाली श्रारनियमनाचा तगादा लावण्यात येत आहे तर दुसरी दिवसाही पथदिवे सुरू ठेवण्याची किमया महावितरणच्या उदासिनतेमुळे होत आहे. त्यामुळ सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.