उदगीर : मयताच्या नावावर गेल्या ९ वर्षापासून सुरू असलेला रॉकेलचा कोटा स्थगित करण्यात येत असल्याची नोटीस अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने मयताच्याच नावाने बजावली आहे़ उदगीर येथील रॉकेलचे अर्धघाऊक विक्रेते सुग़़ कोटलवार यांचे सन २००५ साली निधन झाले़ परंतु, त्यांचा रॉकेलचा परवाना गेल्या जून महिन्यापर्यंत सुरुच होता़ नियमबाह्य भागीदारी दाखवून मयत कोटलवार यांचा परवाना सुरू असल्याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे तालुका निमंत्रक अनंत पारसेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती़ दरम्यान, २४ जून रोजी लोकमतमधून मयत विक्रेत्याच्या नावावरील हजारो लिटर रॉकेल जाते कुठे? मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले़ या वृत्ताची दखल घेण्यात आली़ त्यामुळे उदगीरच्या तहसीलदारांनी चौकशी करून जिल्हा कार्यालयाकडे अहवाल सादर केला होता़ त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने ५ जुलै रोजी मयत अर्धघाऊक विक्रेते सुग़़ कोटलवार यांना नोटीस बजावून या नोटिसीव्दारे रॉकेलचा कोटा स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे़मयत सुग़क़ोटलवार यांचा मृत्यू होऊन ९ वर्षे झालेली असताना त्यांच्या नावाने उचलण्यात आलेले रॉकेल कोणाच्या घशात गेले याची कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे़ या प्रकरणातील दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे़ (वार्ताहर)तहसीलदारांकडून झाली चौकशी़़़सदरचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत उदगीरचे अर्धघाऊक विक्रेते केतकी संगमेश्वर ट्रेडींग कंपनी यांच्याकडे पर्यायी व्यवस्था म्हणून जोडली आहे़ त्यामुळे ग्राहकांची अडचण होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़
रॉकेलचा कोटा स्थगितीची नोटीस
By admin | Updated: July 19, 2014 00:41 IST