शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

सीट बेल्ट नव्हे, ‘सुरक्षा रक्षक’

By admin | Updated: June 10, 2014 00:53 IST

प्रतिनिधी , उस्मानाबाद केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाले आहे़

प्रतिनिधी , उस्मानाबादकेंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाले आहे़ त्यांच्या निधनाने मराठवाडा पोरका झाला असून, लोकनेता हरपल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या़ तर मुंडे यांनी सीट बेल्ट घातला असता तर कदाचित माझा मित्र वाचू शकला असता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली़ त्या पार्श्वभूमीवर गाडीतील सीट बेल्ट हा सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, नेत्यांच्या चालकांना त्याबाबतचे कितपत भान असते, नेतेमंडळींसह वाहन मालक कितपत सीट बेल्टचा वापर करतात, हा प्रश्न समोर येत आहे़उस्मानाबाद शहरासह जिल्हाभरातील रस्ते, महामार्ग, राष्ट्रीय महामार्गावरून हजारो कार, गाड्या दररोज धावताना दिसतात़ मात्र, बहुतांश कारसह इतर गाड्यांचे चालक, आतमध्ये बसलेल्या नागरिकांनी सीट बेल्ट लावल्याचे दिसून येत नाही़ विशेष म्हणजे उस्मानाबाद शहर व परिसरात फिरणाऱ्या चालकांना सीट बेल्ट लावण्यात जणू रसच नाही, असे रस्त्यावरील परिस्थितीवरून दिसून येते़ मात्र, सीट बेल्ट लावल्यानंतर अपघातावेळी जाणारे बॅल्स, ब्रेक मारल्यानंतर जाणारा तोल आदी बाबी थांबू शकतात़ शिवाय अपघातानंतर होणाऱ्या अघटीत घटनाही रोखल्या जावू शकतात, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले़ बेल्टसह हेल्मेटही हवेचधावपळीच्या युगात सीटबेल्ट लावण्याकडे चालकांसह गाडीत बसणारेही दूर्लक्ष करताना दिसून येतात़ मी स्वत: गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावतो़ शिवाय चालकासह गाडीतील इतरांनाही लावण्यास सांगतो़ अपघात रोखण्यासाठी, अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी सीट बेल्टसह दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट हे गरजेचे आहे़ चालकांसह दुचाकीस्वारांनी सर्वांनी नियमांचे पालन करावे, अशी प्रतिक्रीया माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली़सीट बेल्ट लावतोचमाझ्या गाडीलाही दोन वेळेस अपघात झाला आहे़ सीट बेल्टने काय फायदा होतो, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे़ त्यामुळे गाडीत बसल्यानंतर अगोदर सीट बेल्ट लावतो़ चालकासह गाडीतील इतरांनाही तो लावण्यास सांगतो़ सीट बेल्टचे अपघातानंतरच महत्त्व कळते़ अघटित घटना टाळण्यासाठी प्रत्येकांनी सीट बेल्ट लावावा, अशी प्रतिक्रीया आ़ ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केली़कारवाईसह सूचनाहीजिल्ह्यात अपघाताची संख्या वाढली आहे़ वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यानंतर अपघात टाळतात येतात़ विशेषत: अपघातावेळी सीट बेल्ट असेल तर अनेकांचा जीव वाचू शकतो़ ट्राफिक सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांनी सीट बेल्ट लावला नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते़ तसेच सीट बेल्टचे महत्त्व सांगून तो वापरण्याबाबत चालकांना सूचना देण्यात येतात, असे वाहतूक शाखेचे सपोनि संजीव राऊत म्हणाले़सवय लावून घ्यामुंबई, पुण्यासारख्या शहरात अनेक चालक, वाहन मालक कारवाई टाळण्यासाठी काही काळ सीट बेल्ट लावताना दिसून येतात़ उस्मानाबाद व परिसरातील जिल्ह्यातही अनेकजण सीट बेल्ट लावत नाहीत़ कारवाईमुळे नव्हे तर जीव वाचविण्यासाठी सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे़ सर्वांनी त्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार यांनी केले़सातत्याने कारवाई व्हावीभाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने खांद्यावर दिल्यामुळे मला दररोज प्रवास करावा लागतो़ पक्ष-संघटना बळकट करण्यासाठी बैठका, सभांना ठिकठिकाणी जावे लागते़ प्रवासादरम्यान मी सीट बेल्ट वापरतो़ मोठ्या शहरात सीट बेल्टचा कायदा पाळण्यात येतो़ उस्मानाबादकरांना सीट बेल्टची सवय लागण्यासाठी सातत्याने कारवाई होण्याची गरज असल्याचे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी सांगितले़काळाची गरजमी माझ्या कामानिमित्त महिन्यातून जवळपास २० दिवस विविध शहरांमध्ये जातो़ वेळा मी स्वत:च माझी गाडी चालवत असल्यामुळे सीट बेल्ट लावतोच़ गाडीच्या बाबतीत सर्वात सुरक्षित बाब म्हणून सिटबेल्ट जगात नावाजलेला आहे़ वाढते अपघात पाहता सर्वांनी सीट बेल्ट काळाची गरज असून, गाडीमालकांसह चालकांनी लक्ष देण्याची गरज व्यवसायिक किशोर कुलकर्णी यांनी व्यक्त केली़वाहतूक शाखेची कारवाईसीट बेल्ट न घालता वाहने चालविणाऱ्या तब्बल ५३० वाहनचालकांवर वाहतूक शाखेने गत दीड वर्षात कारवाई केली आहे़ प्रत्येकी १०० रूपये प्रमाणे त्यांच्याकडून ५३ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ यामध्ये सन २०१३ मध्ये ४६० चालकांवर कारवाई करून ४६००० रूपयांचा तर चालू वर्षात ७० वाहनचालकांवर कारवाई करून ७००० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे ट्रॉफिक सिग्नलच नव्हे तर शहराच्या इतर विविध भागातही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कारवाईची मोहीम राबविली आहे़ वाहनचालक गॅसवरअनेक नेत्यांसह अधिकारी, व्यवसायिकांच्या वाहनांचे वेळेवर मेंटनन्स करण्यात येत नसल्याचे अनेक चालकांनी खासगीत बोलताना सांगितले़ वेळेत वाहनाचे मेन्टनन्स होत नसल्याने मार्गावर विशेषत: ग्रामीण भागातील रस्त्यावरून गाडी नेताना चालकांना ‘गॅस’वरच रहावे लागते़ त्यामुळे वाहन मालकांनी आपापल्या वाहनांचे मेंटनन्स वेळेत करण्याकडे लक्ष द्यावे़