शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार तर सेनेकडे तीन पं.स.

By admin | Updated: September 14, 2014 23:37 IST

परभणी : येथील पंचायत समिती पुन्हा आपल्या ताब्यात राखण्यात शिवसेनेने यश मिळविले.

परभणी : येथील पंचायत समिती पुन्हा आपल्या ताब्यात राखण्यात शिवसेनेने यश मिळविले. रविवारी झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी शिवसेनेच्या निलावती बापूराव गमे तर उपसभापतीपदी शिवसेनेचेच राजेंद्र अण्णासाहेब गमे विजयी झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी शिवसेनेला मदत केली.सभापती आणि उपसभापती निवडीसाठी १४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक पार पडली. सभापती पदासाठी शिवसेनेकडून निलावती बापूराव गमे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना शिवाजीराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेच्या निलावती गमे यांना १० तर राकाँच्या अर्चना गायकवाड यांना ९ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निलावती गमे यांना विजयी घोषित केले.उपसभापतीपदासाठी शिवसनेकडून राजेंद्र अण्णासाहेब गमे यांनी तर काँग्रेसच्या संगीता नारायणराव रेंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. राजेंद्र गमे यांना १० तर संगिता रेंगे यांना ९ मते मिळाली. त्यामुळे उपसभापतीपदी राजेंद्र गमे यांना विजयी घोषित करण्यात आले. दोन्ही पदांच्या निवडीसाठी माकपच्या अंजली विलास बाबर तटस्थ राहिल्या. या पंचायत समितीमध्ये २० सदस्य असून, शिवसेनेचे सर्वाधिक ८ सदस्य आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी शिवसेनेला मदत केली. तर राकाँला उरलेले ५, काँग्रेसचे ३ आणि एक अपक्ष असे ९ मते मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा या पंचायत समितीवर शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केले. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी काम पाहिले. त्यांना गटविकास अधिकारी एस. एन. गोपाळ यांनी सहकार्य केले.नवनिर्वाचित सभापती निलावती गमे आणि उपसभापती राजेंद्र गमे यांचे खासदार बंडू जाधव यांनी स्वागत केले. यावेळी कल्याणराव रेंगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, मनपाचे गटनेते अतुल सरोदे आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. परभणी पंचायत समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. दोन्ही गटाकडील समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी परिसरात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.शिवसेनेने गड राखला : बंडू जाधवमागील वेळी आमच्याच गटाच्या सभापती होत्या. परंतु उपसभापतीपद मात्र आम्ही मिळवू शकलो नव्हतो. या निवडणुकीत आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीचा सफाया करुन ही उणिव भरुन काढली असून, या निवडीने आनंद झाला. परभणी हा शिवसेनेचा गड असल्याचे या निवडीने सिद्ध केले, अशी प्रतिक्रीया खा.बंडू जाधव यांनी यावेळी दिली.शिवसैनिकांत उत्साहविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडींना महत्त्व प्राप्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य मिळाल्याने शिवसेनेने परभणी पंचायत समिती आपल्या ताब्यात राखली आहे. त्यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण असून, या वातावरणाचा आगामी काळात शिवसेनेला लाभ होऊ शकतो.सोनपेठ: येथील पंचायत समिती सभापती व उपसभापतीपदाची निवड बिनविरोध झाली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डिघोळ इ.च्या छायाताई दत्तराव शिंगाडे यांची तर विटा खु. चे मदनराव विटेकर यांची उपसभापतीपदी निवड झाली.पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेत सभापती व उपसभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी काम पाहिले. त्यांना प्रभारी गटविकास अधिकारी स्वप्नील पवार यांनी सहाय्य केले. निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उभयतांचा सत्कार केला. यावेळी माजी आ.व्यंकटराव कदम, कृउबासचे सभापती राजेश विटेकर, संचालक श्रीराम भंडारे, अशोकराव यादव, नगरसेवक राजाभाऊ अंभोरे, भास्करराव भोसले, जगदीश बुरांडे, माजी पं.स. सदस्य उत्तमराव शिंदे, श्रीकांत विटेकर, कल्याणराव हिके, केशवराव भोसले, शिवाजीराव भोसले व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)पूर्णा: येथील पं.स.च्या सभापतीपदी अपक्ष चंद्रकला व्यंकटी देसाई तर उपसभापतीपदी शिवसांभ देशमुख यांची निवड झाली. १४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीमध्ये विशेष सभा घेण्यात आली. सभापतीपदासाठी चंद्रकला देसाई व राकाँच्या गंगासागर श्रीधर पारवे यांनी अर्ज दाखल केले. दुपारी २ वाजेच्या सुमारास निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. ८ पैकी ७ सदस्यांनी हात वर करुन चंद्रकला देसाई यांच्या बाजूने मत दिले. तर राष्ट्रवादीचे अशोक बोखारे हे तटस्थ राहिले. निवडणूक अधिकारी सुनील महिंद्रकर यांनी चंद्र्रकला देसाई विजयी झाल्याचे घोषित केले. उपसभापतीपदासाठी राकाँचे अशोक बोखारे व काँग्रेसचे शिवसांभ देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत अशोक बोखारे यांनी अर्ज मागे घेतल्याने उपसभापतीपदी शिवसांभ देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सुधाकर खराटे, काँग्रेसचे हनुमंत डाके, काशिनाथ काळबांडे, छगनराव मोरे, गजानन बुचाले, दयानंद कदम, साहेब कदम, नितीन कदम, डॉ.संजय लोलगे, विजय वरपूडकर, माधव कदम, बालासाहेब देसाई, सुरेश देसाई, प्रशांत कदम आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा पं.स.तर्फे गटविकास अधिकारी मायावती थोरात यांनी सत्कार केला.(प्रतिनिधी)सेलू: सेलू पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या बायनाबाई लोंढे व उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे संतोष डख यांची बिनविरोध निवड झाली. रविवारी पंचायत समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभापती व उपसभापतीपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे बायनाबाई लोंढे व संतोष डख यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीचे एकूण १० सदस्य आहेत. त्यात राष्ट्रवादीकडे ८ तर शिवसेनेकडे दोन सदस्य आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असल्यामुळे सेनेच्या बायनाबाई लोंढे यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार नसल्यामुळे बहुमत असतानाही राष्ट्रवादीला उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले आहे. रविवारी विशेष सभेसाठी पंचायत समितीचे दहा पैकी नऊ सदस्य उपस्थित होते. अपेक्षेप्रमाणे बायनाबाई लोंढे यांची सभापती तर उपसभापतीपदी संतोष डख यांची निवड झाली आहे. यावेळी तहसीलदार आसाराम छडीदार, गटविकास अधिकारी प्रभाकर शिंदे उपस्थित होते. (प्रतिनिधी)मानवत : मानवत पंचायत समितीच्या सभापतीपदी रोहिणी बळीराम सोरेकर यांची तर उपसभापतीपदी दीपक मगर यांची १४ सप्टेंबर रोजी चार विरुद्ध २ अशी निवड झाली. मानवत पंचायत समिती सहा सदस्यांची असून, यात शिवसेनेचे चार तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य आहे. मागील वेळी सभापती पद ओ.बी.सी. महिलेसाठी राखीव होते तर यावेळेस खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी हे पद राखीव होते. शिवसेनेच्या पार्वती अनिल कदम या सभापती होणार असे वाटत असतानाच शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींना वेग आला आणि ऐनवेळी शिवसेनेच्या रोहिणी सोरेकर सभापती तर दीपक मगर उपसभापतीपदी निवडल्या गेले. सभापतीपदासाठी शिवसेनेतर्फे रोहिणी सोरेकर व पार्वती कदम यांनी अर्ज केला होता. तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे दीपक मगर व दासराव भालेराव यांनी अर्ज केला होता. ऐनवेळी राकाँच्या सविता भारत उक्कलकर व काँग्रेसच्या निता ज्ञानोबा काजळे यांनी शिवसेनेचे सभापती व उपसभापती पदाचे उमेदवार रोहिणी सोरेकर व दीपक मगर यांना पाठिंबा दिल्याने या दोघांची निवड झाली. पीठासन अधिकारी म्हणून दिलीप कच्छवे यांनी काम पाहिले. त्यांना बी.डी. मेथे पाटील यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)जिंतूर : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदी निवडणूक बिनविरोध पार पडली. सभापतीपदी शांताबाई गायकवाड तर उपसभापतीपदी शेख मोबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे.येथील पंचायत समिती सभागृहात पीठासन अधिकारी संभाजी झावरे, प्रभारी गटविकास अधिकारी एस.व्ही. गोरे, तहसीलदार तडवी यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला १६ सदस्य उपस्थित होते. शांताबाई वचिष्ठ गायकवाड यांचे नाव रवींद्र घुगे यांनी सूचविले. तर शेख मोबीन यांचे नाव उपसभापतीपदासाठी रामप्रसाद माघाडे यांनी सूचविले. इतर कोणाचाही अर्ज न आल्याने या दोघांचीही निवड बिनविरोध पार पडली. सभागृहात राकाँचे १५ सदस्य असून वैष्णवी भगवान देशमुख ह्या गैरहजर राहिल्या. तर अपक्ष शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे अंबादास देशमुख यांची सभागृहात उपस्थिती होती. उर्वरित काँग्रेसचे दोन सदस्य व शिवसेनेचा एक सदस्य गैरहजर होता. निवडीनंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. विजय भांबळे यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक गेल्यानंतर फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. पालम : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अ‍ॅड.विजयकुमार शिंदे यांची तर उपसभापतीपदी शेकापच्या चित्रकला विश्वनाथ हत्तीअंबिरे यांची बिनविरोध निवड झाली. पालम पंचायत समितीची सदस्यासंख्या १० आहे. यात आ.घनदाट मित्रमंडळ ४, राष्ट्रवादी २, शेकाप २ व भाजपा २ असे पक्षीय बलाबल आहे. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी दुपारी २ वाजता विशेष सभा बोलविण्यात आली होती. घनदाट मित्रमंडळाचे श्रीकांत वाडेवाले यांनी राष्ट्रवादीची बाजू घेतली होती. तर रामेश्वर धाडवे हे सभेसाठी गैरहजर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीचे पारडे जड झाले. सकाळी १० ते १२ या वेळात सभापतीपदासाठी अ‍ॅड.विजयकुमार शिंदे व भाजपाच्या पार्वतीबाई लक्ष्मण कुऱ्हे यांचे तर उपसभापतीपदासाठी चित्रकला हत्तीअंबिरे व विनयक आडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर पार्वतीबाई कुऱ्हे व विनायक आडे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड झाली. यावेळी अ‍ॅड.विजयकुमार शिंदे, चित्रकला हत्तीअंबिरे, निता एकनाथ शिंदे, नामदेव कदम, पार्वतीबाई कुऱ्हे, अनुसया घोरपडे, श्रीकांत वाडेवाले, अ‍ॅड.खंडू पवार यांची उपस्थिती होती. पीठासन अधिकारी म्हणून गोविंद रणेरकर यांनी काम पाहिले. यावेळी गटविकास अधिकारी मधुकर कदम यांची उपस्थिती होती. सभापती व उपसभापती यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खा.सुरेश जाधव, लक्ष्मणराव गोळेगावकर, प्रभाकर सिरसकर, वसंत सिरसकर, कादरभाई गुळखंडकर, केशव कऱ्हाळे, दिलीप सोळंके, शांतीस्वरुप जाधव, तुषार दुधाटे, तुकाराम पाटील, लक्ष्मण कुऱ्हे, गणेश घोरपडे आदींची उपस्थिती होती. या निवडीत घनदाट मित्रमंडळ एकाकी पडले आहे.(प्रतिनिधी)गंगाखेड : गंगाखेड पंचायत समितीच्या सभापतीपदी अपक्ष उद्धवराव भानुदासराव कदम तर उपसभापतीपदी मंजुषाताई अण्णासाहेब जामगे यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे सभापती आणि उपसभापती दोघेही अपक्ष आहेत. येथील पंचायत समिती निवडणूक एक महिन्यापासून गाजत होती. या निवडणुकीत पक्षांच्या उमेदवाराला बाजुला ठेवत अपक्षांनी आपली ताकद दाखवून पं.स. ताब्यात घेतली. सभापतीपदासाठी उद्धवराव कदम आणि उपसभापतीपदासाठी मंजुषा जामगे यांचे एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी अनिताताई कदम (अपक्ष), अनिता मुंडे, मुक्ताबाई वाहुळे (भाजप), उत्तमराव पोले, प्रल्हाद शिंदे (राकाँ) यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचे २ आणि घनदाट मित्रमंडळाचा एक असे पाच सदस्य अनुपस्थित राहिल्याने उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांच्या प्रयत्नांना यश आले व बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या निवडणुकीत डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी शांत राहण्याची भूमिका बजावली. आ.सीताराम घनदाट यांनी थोडफार प्रयत्न केले, परंतु, ते निष्फळ राहिले. त्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचा ग्रामस्थांच्या वतीने अंकुशराव गुट्टे यांनी सत्कार केला. पीठासन अधिकारी म्हणून एस.एस. मावची यांनी काम पाहिले. त्यांना गटविकास अधिकारी एस.व्ही. इस्कापे, नायब तहसीलदार एन.पी. भातांब्रेकर यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)पाथरी : पाथरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निवडणूक बिनविरोध होऊन सभापतीपदी राकाँचे तुकाराम जोगदंड आणि उपसभापतीपदी राकाँचेच डॉ.बालासाहेब घोक्षे यांची निवड झाली. यामुळे पंचायत समितीवर राकाँचे वर्चस्व कायम राहिले आहे.१४ सप्टेंबर रोजी पंचायत समिती सभागृहात या निवडीसाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पं.स. सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली. दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध होऊन सभापतीपदी तुकाराम जोगदंड तर उपसभापतीपदी बाळासाहेब घोक्षे यांची वर्णी लागली. या निवडणुका शांततेत पार पडल्या. (वार्ताहर)पाथरी पंचायत समिती सभागृहात ८ सदस्य आहेत. राकाँचे ६, काँग्रेस १ आणि शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. विद्यमान सभापती आणि उपसभापती यांच्या पदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर नवीन निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी सुटल्याने या पदासाठी अनेक जण इच्छुकही होते. आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या गटाच्या ताब्यात पंचायत समिती असल्याने बाबाजानी दुर्राणी म्हणतील तोच सभापती व उपसभापती होईल, हे निश्चित झाले होते. निवड प्रक्रियेच्या पूर्वीच सभापती पदासाठी तुकाराम जोगदंड आणि उपसभापती पदासाठी बालासाहेब घोक्षे यांची नावे निश्चित करण्यात येऊन सदस्य सहलीवर गेले होते.