सितम सोनवणे , लातूरलातूर शहरातील नाना-नानी पार्क मध्ये वयोवृध्दांच्या विश्रांतीसाठी तसेच बालकांसाठी खेळाचे महत्वाचे स्थान बनले आहे़ तसेच बालकांना खेळण्यासाठी बांधण्यात आलेले झोके तुटले आहेत़ तसेच तळ्यातील पाणी अटत आले असून पाण्याने तळ गाठला आहे़ मागील कांही दिवसांपासून नाना-नानी पार्कची दुरवस्था झाली असून, मनपा प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्षच आहे़लातूर शहरातील नाना-नानी पार्क मध्ये वयोवृध्द, लहान मुले तसेच नागरिकांनी हे उद्यान गजबजलेले असते़ सायंकाळच्या सुमारास तर येथे मुलांची मोठी गर्दी होते़ पण मागील काही दिवसांपासून या उद्यानाचे एका बाजूची संरक्षण भिंत अर्धी पडली आहे़ पाण्याअभावी छोटी रोपटे, गवत वाळले आहे़ या परिसरातील कारंजे बंद झाले आहेत़ पाण्याअभावी तलावातील माशांचे प्रमाण कमी झाले आहेत़ तर याच उद्यानात खुले नाट्यगृह बांधण्यात आले आहे़ त्याची ही दुरवस्था झाली आहे़ प्रेक्षकांना बसण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्टेप्सवरील फरशा ही फुटल्या आहेत़ त्यासमोरच असलेले बाल उद्यान हे आता ओसाड पडलेल्या अवस्थेत आहे़ बालकांसाठी बांधण्यात आलेले झोपाळे तुटले आहे़ घसरगुंडीलाही मोठे छिद्र पडले आहे़ त्याच्यासोबत लावण्यात आलेले स्प्रिंगचे बदक, घोडा हे तुटले आहेत़ त्यामुळे बालकांना या उद्यानात खेळण्याचे एक ही साधन राहिले नाही़ उद्यानात जिराफ, सिंह, अशा प्रण्यांच्या प्रतिमा बनवण्यात आल्या आहेत़ त्यातील जिराफाची प्रतिकृती फुटली आहे़ तर वाघ, सिंह यांच्या प्रतिमाचे रंग उडाले आहेत़ मुले या प्रतिमांबरोबर खेळण्यापेक्षा या प्रतिमा पाहताच मुले घाबरत आहेत़ उन्हाळ्याच्या सुट्यात नेहमीच बच्चेकंपनीच्या खेळासाठी गजबजलेले हे उद्यान उन्हाळ्याच्या सुट्या लागण्या अगोदरच उद्यानाला अवकळा आली आह़े तरी मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांत याबाबत संताप व्यक्त होत आहे़
नाना-नानी पार्कच्या शोभेवर विघ्न !
By admin | Updated: April 8, 2015 00:51 IST