नांदेड :मुस्लिम समाजाला डावलून फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक मांडणार्या शासनाने संवैधानिक जबाबदारी म्हणून राजधर्म पाळावा, असे आवाहन ऑल इंडिया तन्जिम-ए-इन्साफचे राष्ट्रीय सचिव फारुख अहमद यांनी केले आहे. तसेच मुस्लिम समाजाचे मागासलेपण व आरक्षणाचे महत्व या विषयावर प्रबोधन अभियान सुरु आहे.यावेळी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक परिस्थितीचे अभ्यासक प्रा. डॉ. एम. ए. बसीर यांनी मनोगत व्यक्त केले. इस्माईल तन्वीर, प्रा. डॉ. एम. ए. बसीर, बालाजी थोटवे, मिर्झा अमजद बेग, महमंद कासीम, महमंद फहीम, जावेद हाश्मी, अँड. शे. बिलाल, शेखर पोपूलवार यांची उपस्थिती होती. /(प्रतिनिधी)
मुस्लिम आरक्षण प्रबोधन अभियान
By admin | Updated: January 12, 2015 14:30 IST