जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेने पोलिस वसाहतीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून सुमारे २५ लाख रुपयांची पाणीपट्टी अदा केली. परंतु पालिका प्रशासनाने या निवासस्थानांना आजपर्यंत नियमितपणे पाणीपुरवठा केलेला नाही. पोलिस अधीक्षकांनी या गोष्टीचा पालिका प्रशासनास जाब विचारावा अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हाध्यक्ष चिन्नादोरे यांनी एक निवेदन सादर केले. त्याद्वारे या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील पाणीपुरवठ्या संदर्भात प्रशासनाने १० आॅक्टोबर २०१३ रोजी जवळपास २५ लाख रुपयांची पाणीपट्टी अदा केली. परंतु पालिका प्रशासनाने या वसाहतीस आजपर्यत नियमित पाणीपुरवठा केलाच नाही.त्यामुळे पोलिस प्रशासनाने या गोष्टीचा मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. पाण्याचे नियोजन काय, पाणी किती दिवसाला देता, एवढी मोठी पाणीपट्टी भरल्यानंतर दररोज पाणीपुरवठा का होत नाही, या गोष्टीचा खुलासा मागविला पाहिजे असे ते म्हणाले.गेल्या तीन वर्षांत पालिका प्रशासनाचे सर्व विभागातंर्गत दैनंदिन कामकाजावर वरील नियंंत्रण संपुष्टात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठाही कोलमडला आहे. सर्व वसाहतीत सर्वसामान्य नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. विशेष म्हणजे मुख्याधिकाऱ्यांना या सर्व गोष्टी अवगत असताना ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप चिन्नदोरे यांनी केला.दरम्यान, पालिका प्रशासनाने याच पद्धतीने न्यायालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य वसाहतींना सुद्धा पाणीपुरवठा करताना निष्काळजी पणा दाखविल्याचा आरोप चिन्नादोरे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)गळती सुरुचयेथील नगर पालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षांत गळतीच्या दुरुस्तीसाठी १७ लाख रुपयांचा खर्च केला आहे. परंतु गळती दुरुस्ती होत नाही. त्यामुळे यात दोष कुणाचा असा सवाल चिन्नादोरे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केला.
लाखोंची पाणीपट्टी भरुन पाणी मिळेना
By admin | Updated: July 4, 2014 00:18 IST